नेत्यांना भेटल्यावर मंत्रिपद मिळते हा गैरसमज:संजय शिरसाट यांनी आढले आमदारांचे कान; 11-12 तारखेला मंत्रिमंडळ विस्ताराचा दावा

शिवसेनेचा आमदार जर भाजप नेत्यांना भेटत असेल, एनसीपीचा आमदार शिवसेनेच्या नेत्यांना भेटत असेल तर त्याची मंत्रिमंडळात वर्णी लागते असा कोणताही भाग नाही. ज्या- ज्या पक्षाचा नेता त्या- त्या पक्षातील कोणता आमदार मंत्री होईल, हे ठरवत असतो. हा त्यांचा स्वतंत्र अधिकार आहे. त्यांना इतरांच्या रेकमेंडेशनची गरज नाही. त्यामुळे मी त्यांना भेटल्यावर मंत्रीपद मिळते, असा गैरसमज करू नका, असा सल्ला शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी दिला आहे. विधिमंडळाचे सात ते नऊ तारखेला विशेष अधिवेशन बोलवण्यात आले आहे. 11 किंवा 12 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी सुतवाच केले आहे. तयामुळे राज्यात लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचा दावा शिरसाट यांनी केला आहे. मात्र मंत्रिमंडळात कोणाचा समावेश असेल तर त्या पक्षातील नेते ठरवतील, असे देखील शिरसाट यांनी म्हटले आहे. एकूण 232 विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहे. त्यात राज्यात मंत्रीपदे कमी आहेत. त्यामुळे या सर्वांचा ताळमेळ बसवला लागेल. येथे सर्व पक्षाच्या नेत्यांना त्यांचे कौशल्य दाखवावे लागणार आहे. आणि त्या आधारित या नवीन मंत्रिमंडळाची निवड करावी लागणार असल्याचे शिरसाट यांनी म्हटले आहे. सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर सुप्रिया सुळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अभिमान वाटावा असेच काम राज्य सरकार करेल, असा विश्वास संजय शिरसाट यांनी व्यक्त केला. राज्याचा विकास होईल असेच काम सरकार असल्याचे शिरसाट यांनी म्हटले आहे. सुळे यांनी दिलेल्या आवाहनाला शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिले आहे. लाकडी बहिण योजनेचा गैरफायदा लाडकी बहिण योजनेची छाटणी केली जाईल, याचा अर्थ कोणाला बाद करणार असा होत नाही. कोणी चुकीची कागदपत्र सादर केले असतील आणि त्याचा गैरफायदा घेत असतील, हा त्यामागचा उद्देश असल्याचे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीची योजना सुरूच राहणार असल्याचा दावा देखील या माध्यमातून त्यांनी केला. ओबीसी समाजावर अन्याय व्हायला नको सरकारची भूमिका ही सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाण्याची आहे. मराठा समाज, ओबीसी समाज, दलित समाज, आदिवासी समाज या सर्व समाजाला सोबत घेऊन जाण्याची सरकारची मानसिकता आहे. कोणत्याही समाजाला न्याय देताना दुसऱ्या समाजावर अन्याय होऊ नये, हे एकनाथ शिंदे साहेबांनी या आधी देखील सांगितले होते. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजावर अन्याय व्हायला नको, अशी भूमिका देखील त्यांनी घेतली होती. त्याचप्रमाणे आता नवीन सरकार देखील कोणत्याही समाजावर अन्याय होऊ देणार नसल्याचे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. मराठवाड्यासाठी नदीजोड प्रकल्प महत्त्वाचा नदी जोड प्रकल्प हा मराठवाड्यासाठी अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. महाराष्ट्राच्या इतर भागात अतिरिक्त पाऊस पडत आहे आणि ते पाणी समुद्राला मिळत आहे. इतकेच नाही तर त्यामुळे पूर परिस्थिती निर्माण होते. मात्र जर नदीजोड प्रकल्प झाला तर बॅलन्स राखता येईल. मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागाला हे पाणी मिळू शकते, असे देखील शिरसाट यांनी म्हटले आहे.

  

Share