जीवनात बदल घडलेले याेग साधक आणतायत जगात परिवर्तन:ऋषिकेशमध्ये आयाेजित आंतरराष्ट्रीय याेग महाेत्सवात 50 देशांतील 1200 परदेशी साधक सहभागी

उत्तराखंडच्या ऋषिकेश येथील परमार्थ निकेतनमध्ये ३७ व्या आंतरराष्ट्रीय याेग महाेत्सवाला प्रारंभ झाला आहे. यंदा ५० देशांतील १२०० हून जास्त परदेश याेग साधक सहभाग झाले. हा महाेत्सव १५ मार्चपर्यंत चालेल. फुलांच्या रंगाेत्सवाने उत्सवाचा समाराेप हाेईल. या याेग महाेत्सवात जगभरातील अनेक प्रसिद्ध याेगगुरू सहभागी हाेतात. त्यात अष्टांग याेग, हठयाेग, राजयाेग, भक्तियाेग, कुंडलिनी याेग व ध्यान हे प्रमुख आहेत. त्यात याेगाचार्य गुरमुखकाैर खालसा, याेगाचार्य टाॅमी राेसेन, याेगाचार्य किया मिलर, याेगाचार्य एरिका काॅफमॅन, याेगाचार्य सियाना शर्मन, याेगाचार्य संदीप देसाई, याेगाचार्य आनंद मेहराेत्रा, याेगाचार्य इरा त्रिवेदी, याेगाचार्य स्टिवर्ट गिलख्रिस्ट, याेगाचार्य मारिया अलेझांद्रा अवचारियन, याेगाचार्य निकाेलस जियाकाेमिनीसह इतर सहभागी आहेत. चीनमधील सर्वात माेठे याेगगुरू भारताचे माेहन
माेहन भंडारी ऋषिकेशचे आहेत. ते चीनमधील सर्वात प्रतिष्ठित याेग विद्यालय, याेगीयाेगचे संस्थापक व संचालक आहेत. याेगात व्यापक ज्ञान व अनुभवासह याेग संमेलनात आंतरराष्ट्रीय पातळीवरील ते प्रसिद्ध वक्ता बनले आहेत. अमेरिकेत इंटरनॅशनल असाेसिएशन आॅफ याेग थेरपिस्टद्वारे प्रमाणित याेग चिकित्सकही आहेत. २०१५ मध्ये त्यांची चीनमध्ये सर्वात प्रभावी याेग प्रसारक म्हणून निवडले हाेते. त्यांनी चायना सेंट्रल टेलिव्हिजनसाठी याेगसत्राचे ५२ भाग बनवले. त्यांनी चीनमध्ये ३० हजार लाेकांना याेग साधक बनवले आहे. अमेरिकेतील राॅसन नशा करणाऱ्यांची प्रेरणा
अमेरिकेतील टाॅमी राॅसनने याेगाच्या माध्यमातून जगात परिवर्तन घडवून आणले. ते अल्पवयातच नशापान व जुगाराच्या व्यसनात बुडाले हाेते. राॅसनने २० प्रकारचे ड्रग्ज घेतले हाेते. जुगारात ते जवळील सर्व कमाई गमावून बसले. नंतर ते अमेरिकेतील एका याेग शाळेत गेले. तेथे याेगाने त्यांचे जीवन बदलून टाकले. आता नशा साेडणाऱ्यांसाठी ते प्रेरणा ठरले आहेत. राॅसन अमेरिकेत याेग विद्यालय चालवतात. ते दरवर्षी आंतरराष्ट्रीय याेग महाेत्सवात सहभागी हाेतात. तेथे जगभरातील सर्व याेग साधकांना आपला अनुभव सांगतात. याेगगुरू ३० वर्षांपासून याेग शिकवतायत
अमेरिकेच्या गुरमुखकाैर खालसा यांना १९७२ मध्ये त्यांचे गुरू याेगी भजन यांनी ‘गुरमुख’ नाव दिले. ३० वर्षे जगभर कुंडलिनी याेग, ध्यान, गराेदरावस्थेमधील देखभाल याबद्दल त्या शिक्षण देतात. भारत, तिबेट व मेक्सिकाे येथील अनाथालयांना चिकित्सा सुविधा व ध्यान शिकवण्यासाठी त्या मदत करतात. त्यांनी शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला आहे. ३० वर्षांपासून ताे सुरू आहे. गुरमुखने ‘द ८ ह्यूमन टॅलेंट्स’ व ‘बाउंटीफूल, ब्यूटिफुल, ब्लिसफुल’ नावाचे पुस्तकही लिहिले आहे. त्यांच्या शिष्यांची संख्या लाखांत आहे. बिटल्सने दिली याेगाला वेगळी आेळख ऋषिकेशला आंतरराष्ट्रीय याेगनगरीच्या नावानेही आेळखले जाते. ऋषिकेशला ही आेळख महर्षी महेश याेगी यांच्यामुळे मिळाली. ७० च्या दशकात जगभरात प्रसिद्ध बँड बिटल्सचे सदस्य महर्षी महेश याेगींचे शिष्य झाले हाेते. बिटल्स सदस्य ऋषिकेशला आले आणि त्यांनी कित्येक महिन्यांच्या मुक्कामात याेग केला. त्यानंतर जगभरात ऋषिकेशच्या याेगाची आेळख निर्माण झाली.