लोकेशन डिटेल्ससह पाकिस्तानला सुवर्णमंदिर, काश्मीरचे व्हिडिओ धाडले:एनआयएकडून ज्योती मल्होत्राची 11 तास चौकशी, उद्या न्यायालयात हजर करणार

एनआयएने पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक केलेल्या यूट्यूबर ज्योती मल्होत्राची ७ आणि ४ तासांच्या अशा दोन फेऱ्यांमध्ये चौकशी केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तिने सुवर्णमंदिर आणि काश्मीरमधील पर्यटन स्थळांचे व्हिडिओ त्यांच्या ठिकाणांच्या तपशिलांसह पाकिस्तानी संपर्कांना टेलिग्राम आणि इतर सोशल मीडियावर शेअर केले होते. आयएसआय एजंट अली हसनसोबतचे तिचे चॅटही समोर आले आहेत. यामुळे भारतीय एजंट्सची ओळख पटवण्यासाठी तिचा वापर केला जात असल्याचा संशय बळावला आहे. तिच्या सोशल मीडियावरील हालचाली आणि प्रवासाचे ब्लॉग केवळ मनोरंजक सहली नसून पाकिस्तानी गुप्तचर मिशनचा भाग होते, असे तपास यंत्रणांना वाटते. तथापि, ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान ज्योती आणि आयएसआय एजंट्समधील मजकूर आणि व्हॉइस चॅट फोनमधून डिलीट झालेले आढळले आहेत. आयटी पथके ते परत मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्योतीची पोलीस कोठडी बुधवारी संपत असून, तिला गुरुवारी न्यायालयात हजर केले जाईल. पाकमध्ये माझे लग्न लावून द्या, असे लिहिले चॅट नंबर-१ हसन : तुम्ही अटारीला गेल्यावर तिथे कुणाला प्रोटोकॉल मिळाला?
ज्योती : मला तर नाही मिळाला.
हसन : कुणाला प्रोटोकॉल मिळाला, हे पाहिल्यावर आम्हाला खरे कनेक्शन मिळू शकले असते.
ज्योती : ते सर्व आधीच प्लॅन करून आले होते, कुणीही सहजपणे ओपन झाले नाही.​​​​​​​ शत्रूचे हेर चॅट नंबर-२ हसन : तुम्ही त्याला गुरुद्वारात आणून दोघांना खोलीत बसवायला हवे होते. आता हे सुरू ठेवा.
ज्योती : माझी पहिलीच भेट होती. बहुधा अधिकारी असावी. वाटले,… थांबेल; पण ‘अलर्ट’ होती.
हसन : पुढच्या वेळी लक्षात ठेवा, पुन्हा असे होऊ शकत नाही. हे चॅनल ॲक्टिव्ह ठेवा.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment