लोकांनी मनसेला मतदान केले, पण ते आपल्यापर्यंत आले नाही:राज ठाकरे यांचे निवडणूक निकालावर प्रश्नचिन्ह; EVM वर व्यक्त केला संशय

भाजपला 2014 मध्ये 122 त्यानंतर 2005 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे त्यांना 132 जागा मिळाल्या हे समजू शकतो. मात्र अजित पवार यांना 42 जागा कशा मिळाल्या? यावर कोणाचा तरी विश्वास बसू शकतो का? असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला. त्यामुळे मतदानाच्या आकडेवारीवर जाऊ नका. लोकांनी आपल्याला मतदान केलेले आहे. केवळ ते आपल्यापर्यंत आलेले नाही, असे देखील राज ठाकरे यांनी म्हटले आहे. लोकांनी आपल्याला मतदान केले. मात्र केलेले मतदान हे कुठेतरी गायब झाले. अशा प्रकारे जर निवडणूक लढवायच्या असतील तर निवडणूक न लढवलेल्या बरे, असे देखील राज ठाकरे यांनी म्हटले. अर्थात काही दिवसात ही गोष्ट संपेल. कोणीही अमर पट्टा घेऊन आलेला नाही, अशा गोष्टी होत असतात, असे देखील राज ठाकरे यांनी म्हटले आहे. ज्या शरद पवार यांच्या जीवावर आजपर्यंत अजित पवार आणि छगन भुजबळ राजकारण करत आले. त्या शरद पवार यांना केवळ दहा जागा मिळतात? हे न समजण्याची गोष्ट असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. चार महिन्यांपूर्वीच लोकसभा निवडणुकीत सर्वात जास्त खासदार काँग्रेसचे निवडून आले आहेत. एका खासदारांच्या अंतर्गत सहा आमदार निवडून येतात. मात्र सर्वांच्या सर्व नाही पकडले तरी देखील आमदारांची संख्या वाढायला हवी होती. मात्र त्यांचे केवळ 15 आमदार निवडून येतात? यावर राज ठाकरे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शरद पवार यांचे आठ खासदार निवडून आले होते. त्यांचे केवळ दहा आमदार निवडून येतात? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ज्या लोकसभेत अजित पवार यांचा एक खासदार निवडून येतो. त्या अजित पवार यांचे 42 आमदार कसे निवडून आले? असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला. मात्र हे का झाले? कशामुळे झाले? हा संशोधनाचा विषय असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. विधानसभेचा निकाल आल्यानंतर लोकांमध्ये संभ्रम होता विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले त्यावेळी मी त्यावर प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर पदाधिकाऱ्यांशी मी पहिल्यांदीच भेटत असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर मी शांत आहे याचा अर्थ विचार करत नव्हतो असा नाही. सर्व गोष्टींचे एक विवेचन चालू होते, आकलन चालू होते. यादरम्यान बरेच लोक मला भेटले असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. महाराष्ट्राचा निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रात पहिल्यांदाच सन्नाटा पसरला असल्याचे दिसून आले. वास्तविक मिरवणुकी निघासला पाहिजे होत्या. जल्लोष व्हायला पाहिजे होता. मात्र निकाल आल्यानंतर लोकांमध्ये संभ्रम होता. असा कसा निकाल आला? असे लोकांच्या मनात प्रश्न होते, असे देखील राज ठाकरे यांनी उपस्थित केला. यादरम्यान आरएसएस म्हणजेच राष्ट्रीय सेवा संघाच्या संदर्भातील एका व्यक्तीनेही यावर प्रश्न उपस्थित केल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांचा उल्लेख या वेळी राज ठाकरे यांनी काँग्रेसचे महाराष्ट्रातील नेते बाळासाहेब थोरात यांच्या पराभवर देखील शंका उपस्थित केली. आता पर्यंत दर निवडणुकीला 70 ते 80 हजार मतांनी थोरात निवडून येत आले आहेत. मागील सात टर्म पासून ते आमदार म्हणून निवडून येत आहेत. मात्र तरी देखील ते दहा हजार मतांनी त्यांचा पराभव झाला असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. माझ्या पक्षाचा पराभव झाला म्हणून मी बोलत असल्याचे लोक म्हणतील. मात्र मीच नाही तर महाराष्ट्र बोलत असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. पक्षात बदल होणार, लवकरच आचारसंहिता पक्षात वरपासून कालपर्यंत शिस्त येण्यासाठी एक आचारसंहिता येणार आहे. जे मी वरील पातळीवर बोलेल ते शाखाप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांना आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांना देखील कळायला हवे. पक्षाचे नेमके काय सुरू आहे. हे सर्वांना समजायला पाहिजे, असे देखील राज ठाकरे यांनी म्हटले आहे. त्यामुळे कदाचित काही पदांची नावे देखील बदलली जाणार असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. हळूहळू टप्प्याटप्प्याने तुमच्यासमोर हे मांडणार असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. माझ्यासोबत राहायचे असेल तर ठाम राहा लहानपणापासून मी अनेक पराभव पाहिले आहेत. तसेच अनेक विजय देखील पाहिले आहे पराभवाने कधी खचलो नाही तर विजयाने हरखून देखील गेलो नाही. कसलेल्या, पीसलेल्या लोकांचे नेतृत्व मला करायचे नाही. माझ्यासोबत राहायचे असेल तर ठाम राहा, अशा शब्दत राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह भरला. जे आपल्याला महाराष्ट्रात करायचे आहे, जे महाराष्ट्रातील मराठी माणसासाठी करायचे आहे, ते आपण करणारच आहोत, असा विश्वास राज ठाकरे यांनी व्यक्त केला. आज नाही, उद्या नाही तर परवा करु, मात्र ते होणार म्हणजे होणारच, हे लक्षात ठेवा, असा ठाम विश्वास राज ठाकरे यांनी व्यक्त केला.

  

Share