महाराष्ट्रात एकही पाकिस्तानी नागरिक हरवलेला नाही:सर्वांना पाठवण्यात येईल, त्यासंदर्भात चुकीच्या बातम्या देऊ नका – मुख्यमंत्री फडणवीस

महाराष्ट्रात एकही पाकिस्तानी नागरिक हरवलेला नाही:सर्वांना पाठवण्यात येईल, त्यासंदर्भात चुकीच्या बातम्या देऊ नका – मुख्यमंत्री फडणवीस

महाराष्ट्रात पाकिस्तानी नागरिक हरवले आहेत, अशी चर्चा सुरु होती. यावर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे. माध्यमांनी यासंदर्भातील बातम्या देताना खबरदारी घ्यावी, असा सल्ला मुख्यमंत्री फडणवीसांनी माध्यमांना दिला आहे. राज्यातील एकही पाकिस्तानी नागरिक हरवला नाही, आज संध्याकाळी किंवा उद्यापर्यंत सर्वांना पाकिस्तानात पाठवण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने राबविलेल्या 5 कलमी कारवाईपैकी एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करणे. बहुतेक व्हिसा धारकांना देश सोडण्याची अंतिम तारीख आज 27 एप्रिल आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व मुख्यमंत्र्यांना त्यांच्या राज्यातील पाकिस्तानी लोकांना ओळखून त्यांना परत पाठवण्यास सांगितले आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी उपरोक्त माहिती दिली. नेमके काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? पुणे महानगरपालिकेला 75 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल पुणे अर्बन डायलॉग हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील बेपत्ता झालेल्या पाकिस्तानी नागरिकांबाबत भाष्य केले. गृहमंत्री म्हणून सांगतो, पाकिस्तानी नागरिकांसंदर्भात कृपया चुकीच्या बातम्या करु नका. माध्यमांनी 107 नागरिक हरवले असल्याच्या बातम्या केल्या आहेत. परंतु राज्यातील एकही पाकिस्तानी नागरिक हरवले नाही. सर्वच पाकिस्तानी नागरिक सापडले आहेत. जेवढे पाकिस्तानी आहेत ते सर्व सापडले आहेत. सर्व बाहेर चालले आहेत. सगळ्यांची बाहेर घालवायची व्यवस्था केली आहे. राज्यात एकही पाकिस्तानी नागरिक राहणार नाही. आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत सर्वांना परत पाठवण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने घेतलेले निर्णय कोणते? भारताने इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालयातून स्वतःचे संरक्षण, नौदल आणि हवाई सल्लागारांना माघारी बोलवण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात 48 शहरांत 5023 पाकिस्तानी:नागपुरात सर्वाधिक 2458 जण, 107 बेपत्ता; तुमच्या जिल्ह्यात किती पाक नागरिक? वाचा पहलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर केंद्राने देशभरातील पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश दिलेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सर्वच राज्यांना यासंबंधीचे दिशानिर्देश दिलेत. त्यानुसार, महाराष्ट्र सरकारही यासंबंधीची पाऊले उचलत असताना राज्यातील 48 शहरांत तब्बल 5023 पाकिस्तानी नागरिक आढळल्याचा दावा राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी केला आहे. पूर्ण बातमी वाचा…

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment