महाराष्ट्रासह 3 राज्यांमध्ये हाेळीपूर्वीच उन्हाचा तडाखा:विदर्भात अनेक शहरांत पारा चाळिशीपार

होळी आधीच गुजरात, महाराष्ट्र आणि राजस्थानमधील अनेक भाग उष्ण लाटेच्या विळख्यात सापडले आहेत. गुजरात आणि राजस्थानमधील डझनभराहून अधिक शहरांमध्ये तापमान ४० अंशांपुढे गेले आहे. अनेक ठिकाणी तापमान सरासरीपेक्षा ८.८ अंश सेल्सियसने जास्त आहे. सलग दुसऱ्या दिवशी गुजरात, महाराष्ट्र आणि राजस्थानमधील १७ शहरांमध्ये कमाल तापमान ४० अंशांपेक्षा जास्त नोंदवले गेले. विदर्भातील अनेक शहरांत बुधवारी ४० अंशांपेक्षा जास्त तापमान हाेते. गुरुवारपासून गुजरात, शेजारील राजस्थान आणि पश्चिम किनारपट्टीवरील कोकण प्रदेशात तापमान घटण्याची शक्यता आहे, परंतु उष्णतेची लाट कायम राहील. गोव्यात उष्णतेची लाट, राजकोट @४२.१ अंश बुधवारी ११ राज्यांमध्ये पारा ३८ अंशांवर राहिला. राजकोटला सर्वाधिक तापमान ४२.१ अंश नोंदवले गेले, जे सरासरीपेक्षा ६.७ अंश जास्त होते. राजस्थानच्या बाडमेरला तापमान ४०.६ अंश जे ५.९ अंशांनी जास्त आहे. गोव्यातील पणजी येथे तापमान ३६.८ अंश नोंदवले गेले, जे सरासरीपेक्षा ४.१ अंश जास्त आहे. विदर्भातील तापलेली शहरे हीटवेव्ह म्हणजे… साधारणत: तापमान ४० डिग्रीपेक्षा जास्त किंवा सरासरीपेक्षा ४.६ डिग्रीपर्यंत जास्त असल्यास उष्णतेची लाट मानली जाते.