महात्मा फुलेंचे शैक्षणिक व सामाजिक योगदान:स्त्री शिक्षण, समता आणि सामाजिक न्यायासाठी केले आयुष्यभर कार्य – डॉ. भीमराव वाघमारे

महात्मा फुलेंचे शैक्षणिक व सामाजिक योगदान:स्त्री शिक्षण, समता आणि सामाजिक न्यायासाठी केले आयुष्यभर कार्य – डॉ. भीमराव वाघमारे

अमरावती विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक डॉ. भीमराव वाघमारे यांनी महात्मा फुलेंच्या कार्याचा आढावा घेतला. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात समता सप्ताहानिमित्त आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. डॉ. वाघमारे यांनी महात्मा फुलेंना खऱ्या अर्थाने समाजक्रांतीचे आद्य क्रांतीकारक म्हटले. फुलेंनी सर्व धर्मग्रंथांचा अभ्यास केला. त्यांनी समाजातील विषमता ही मानवनिर्मित असल्याचे स्पष्ट केले. महात्मा फुलेंनी अतिशूद्र आणि स्त्रियांसाठी केलेले कार्य मानवी समानतेच्या स्वातंत्र्याचा पाया ठरले. त्यांनी महिलांच्या शिक्षणासाठी हंटर कमिशनला निवेदन दिले. फुले दाम्पत्यांनी 35 ब्राह्मण विधवांना आश्रय दिला. त्यांनी पितृसत्ताक पद्धतीला विरोध केला आणि दलित, शेतकरी, कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडली. मानवविज्ञान विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. मोना चिमोटे यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की, फुले, गांधी व आंबेडकरांच्या कार्यामुळेच आज महिलांना सर्व क्षेत्रात मानाचे स्थान मिळाले आहे. फुले दाम्पत्यांनी खांद्याला खांदा लावून सामाजिक परिवर्तनासाठी संघर्ष केला. त्यांनी स्त्रियांवरील अत्याचारांविरुद्ध आवाज उठवला आणि त्यांना सन्मान मिळवून दिला.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment