महायुतीला 150 जागांवर यश मिळण्याची शक्यता:अ‍ॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार कोकणात होणार रस्सीखेच

महायुतीला 150 जागांवर यश मिळण्याची शक्यता:अ‍ॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार कोकणात होणार रस्सीखेच

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक पार पडल्या आहेत. त्या अनुषंगाने आता विविध संस्था त्यांचे एक्झिट पोल समोर आणत आहेत. अ‍ॅक्सिस माय इंडियाने देखील त्यांचा एक्झिट पोल दिला आहे. या पोलनुसार, राज्यात महायुती एकहाती सत्ता स्थापन करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. राज्यात महायुतीला 150 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. या पोलनुसार, महायुतीला राज्यात स्पष्ट बहुमत मिळणार आहे. या पोलकडून विभागनिहाय एक्झिट पोलची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. मराठवाड्यात 30 जगांवर महायुतीला यश येईल
अ‍ॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार, मराठवाड्यात एकूण 46 विधानसभेच्या जागा आहेत. यापैकी 30 जागांवर महायुतीला यश मिळणार आहे. तर महाविकास आघाडीला केवळ 15 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. तर एका जागेवर अपक्ष किंवा बंडखोर जिंकून येण्याची शक्यता आहे. खान्देशमध्ये 38 जगांवर यश येईल
उत्तर महाराष्ट्र म्हणजेच खान्देशात विधानसभेच्या एकूण 47 जागा आहेत. यापैकी सर्वाधित जागांवर महायुतीचे उमेदवार जिंकून येतील, असा दावा पोलच्या आकडेवारीनुसार करण्यात आला आहे. पोलच्या आकड्यांनुसार, महायुतीला तब्बल 38 जागांवर यश येईल. तर महाविकास आघाडीला केवळ 7 जागांवर यश मिळवता येईल. तर अपक्षांना 2 जागांवर यश मिळेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रात आघाडीला 21 जगांवर यश येईल
पश्चिम महाराष्ट्रात 36 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीला 21 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहेत. तर इतरांना 1 जागावर यश मिळू शकते, असे पोलनुसार सांगण्यात येत आहे. कोकणात महायुती आणि आघाडीत रस्सीखेच
पोलनुसार, कोकण आणि ठाण्यात महायुती आणि महाविकास आघाडीत टफ फाईट होण्याची शक्यता आहे. या भागात महायुतीला 24 तर महाविकास आघाडीला 23 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. तर इतरांना 2 ठिकाणी यश मिळू शकते. मुंबईत 22 जगांवर महायुतीला यश येईल
मुंबई शहरात एकूण 36 विधानसभा मतदारसंघ आहेत. यापैकी 22 जागांवर महायुतीच्या उमेदवारांचा विजय होईल. तर 14 जागांवर महाविकास आघाडीला यश येईल, असा दावा या एक्झिट पोलमध्ये करण्यात आला आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment