महिलांचा उद्योग, महिन्याला ९० हजार उत्पन्न‎:नागली, उडीद, तांदूळ यापासून बनशेंद्रा येथे बनवतात पापड, कुरडई, खारोडी

महिलांचा उद्योग, महिन्याला ९० हजार उत्पन्न‎:नागली, उडीद, तांदूळ यापासून बनशेंद्रा येथे बनवतात पापड, कुरडई, खारोडी

बनशेंद्रा येथील महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून अन्न प्रक्रिया उद्योग सुरू केला आहे. नागली, उडीद, तांदूळ यापासून पापड, कुरडई, खरोडी तयार केले जात आहेत. या उत्पादनांना पंचक्रोशीतच नव्हे, तर वैजापूर, छत्रपती संभाजीनगर, पुणे, शिरूर आणि मुंबईतून मोठी मागणी आहे. उन्हाळ्यात वर्षभर पुरेल इतके वाळवण करण्यासाठी प्रत्येक महिला सदस्य घरोघर काम करते. पूर्वी महिला एकमेकींना मदत करून वाळवण तयार करत. मात्र, आता हे चित्र बदलले आहे. हीच गरज ओळखून संघर्ष स्वयंसहायता महिला समूहाने हा उपक्रम सुरू केला. रेणुका विष्णू वाघ या बचत गटाच्या अध्यक्ष आहेत. गटात अध्यक्ष, सचिव आणि एकूण १० महिला सदस्य आहेत. रेणुका वाघ यांनी सांगितले की, २०२३ मध्ये समूहाची स्थापना झाली. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेतून २ लाख ७९ हजार रुपये मिळाले. त्यातून यंत्रसामग्री खरेदी करून गावातच पापड, कुरडई, खरोडीचे उत्पादन सुरू केले. सचिव नसरीन शेख यांनी सांगितले की, सकाळी ५ ते ९ वाजेपर्यंत कुरडई, त्यानंतर पापड तयार होतो. रात्री ११ वाजेपर्यंत काम सुरू राहते. संभाजीनगर, पुणे, शिरूर, मुंबई, वैजापूर येथे माल पाठवला जातो. संघर्ष स्वयम सहाय्यता महिला बचत गटाच्या अध्यक्ष रेणुका वाघ, सचिव नसरीन शेख आदी एकत्र येत कुरडई, पापड बनवितात. बचत गटाच्या माध्यमातून महिला करीत असलेल्या उद्यागातून त्यांना महिन्याला ८० ते ९० हजारांचा नफा मिळतो. आता उन्हाळा सुरू झाला असल्याने पापड, कुरडईच्या मागणीत वाढ झाली आहे. यामुळे आता आणखी चांगले उत्पन्न मिळेल, अशी आशा महिलांनी व्यक्त केली आहे. या महिला समूहाला भास्कर जगताप यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या महिलांचे परिसरातून सर्वत्र कौतुक होत आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment