मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन राजकीय अस्तित्व निर्माण करायचे नाही:प्रीतम मुंडे यांनी यांनी मांडली खंत, हा नेमका टोला कोणाला? चर्चेला उधाण
मी लोकसभा लढवले नाही तर मला पाथर्डी शेवगाव विधानसभेचे ऑफर आली होती. माझ्यासाठी रोज एक एक मतदारसंघ तयार होत होता. पण मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेवून माझे राजकीय अस्तित्व निर्माण करायचे नाही, असे स्पष्ट मत माजी खासदार व भाजप नेत्या प्रीतम मुंडे यांनी मांडले आहे. मात्र ही खदखद त्यांनी यावेळी व्यक्त का केली तसेच हा टोला नेमका कोणाला होता, असे प्रश्न निर्माण झाले आहेत. शेवगाव पाथर्डी मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार मोनिका राजळे यांच्या प्रचारार्थ पाथर्डी मतदारसंघात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रीतम मुंडे यांनी संवाद साधला. प्रीतम मुंडे म्हणाल्या मी प्रीतम गोपीनाथ मुंडे आहे, मुंडे साहेबांनी अनेक संघर्ष पाहिले तर माझ्या वाट्याला पण थोडासा संघर्ष येणारच ना? प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. प्रीतम मुंडे म्हणाल्या गोपीनाथ मुंडे यांची लेख हेच पद माझ्यासाठी सर्वात मोठे आहे. पुढे पुढे त्या म्हणाल्या आपल्याला राज्यात महायुतीचे पुन्हा हात बळकट करायचे आहेत. 2019 ला माझ्या सभेसाठी पंकजा मुंडे यांना वेळ देता आला नाही. स्वतःच्या बहिणीसाठी त्यांना वेळ देता आला नाही त्यांच्या शेड्युल खूप व्यस्त असते ते त्यांच्या वेळेनुसार पाथर्डी शेवगाव मध्ये येतील, असेही प्रीतम मुंडे म्हणाल्या.