मनोज जरांगे आज मध्यरात्रीपासून पुन्हा एकदा उपोषणाला बसणार:निवडणुकीच्या तोंडावर सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न

मनोज जरांगे आज मध्यरात्रीपासून पुन्हा एकदा उपोषणाला बसणार:निवडणुकीच्या तोंडावर सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आज मध्य रात्रीपासून पुन्हा एकदा उपोषण सुरू करत आहेत. त्यामुळे त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारकडून होताना दिसत आहे. त्यासाठी खासदार संदिपान भुमरे यांनी जरांगे पाटील यांची भेट देखील घेतली. मात्र, तरी देखील ते उपोषणावर ठाम असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. त्यामुळे आता आज मध्यरात्री पासून जरांगे पाटील उपोषण सुरू करतात का॰ याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी आपले आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने सगेसोयरेच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण दिले नाही तर आगामी विधानसभा निवडणुकीत उतरण्याची घोषणा देखील त्यांनी केली आहे. मात्र,तत्पूर्वी त्यांनी पुन्हा एकदा उपोषणाचे हत्यार उपासले आहे. त्यामुळे आता त्यांच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मनधरणीचे प्रयत्न सुरू मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आज मध्यरात्री पासून पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर निवडणुकीच्या आधी सरकारला घेरण्याची मनोज जरांगे पाटील यांनी योजना आहे. 16 ‎सप्टेंबरला रात्री 12 वाजेपासून ते पुन्हा‎ एकदा आंतरवाली सराटीत उपोषणाला‎ बसणार आहेत. त्या आधीच सरकारच्या वतीने त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरु करण्यात आले आहे. मात्र, त्यांना अद्याप यश आलेले नाही. भुमरे ‎यांची जरांगेंसोबत 2 तास चर्चा‎ छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदिपान‎भुमरे यांनी रविवारी आंतरवाली सराटीत ‎मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली. दोघा‎ नेत्यांमध्ये अडीच तास चर्चा झाली. 16 ‎सप्टेंबरला रात्री 12 वाजेपासून जरांगे पुन्हा‎ एकदा आंतरवाली सराटीत उपोषणाला‎ बसणार आहेत. तसेच यापूर्वी जरांगे यांनी ‎खासदार संदिपान भुमरे यांच्यावर नाराजी‎ व्यक्त केली होती. त्या अनुषंगाने संदिपान ‎भुमरे यांनी जरांगे यांची भेट घेत नाराजी दूर‎ केल्याचे समोर आले. या भेटीत दोघा ‎नेत्यांमधील चर्चेचा तपशील जाहीर झालेला ‎नाही खासदार संदिपान भुमरे यांनी अचानकपणे आंतरवाली सराटी गाठल्याने राजकीय ‎वर्तुळाच चर्चा झाली. जरांगे पाटील यांची भेट ‎मी नेहमीच भेट घेतो. या आधी जेव्हा जरांगे‎ उपोषणाला बसले होते, त्या वेळीही मी त्यांची‎भेट घेतली होती. समाजाच्या हितावर आमची‎चर्चा झाली, असे भुमरे म्हणाले.‎

​मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आज मध्य रात्रीपासून पुन्हा एकदा उपोषण सुरू करत आहेत. त्यामुळे त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारकडून होताना दिसत आहे. त्यासाठी खासदार संदिपान भुमरे यांनी जरांगे पाटील यांची भेट देखील घेतली. मात्र, तरी देखील ते उपोषणावर ठाम असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. त्यामुळे आता आज मध्यरात्री पासून जरांगे पाटील उपोषण सुरू करतात का॰ याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी आपले आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने सगेसोयरेच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण दिले नाही तर आगामी विधानसभा निवडणुकीत उतरण्याची घोषणा देखील त्यांनी केली आहे. मात्र,तत्पूर्वी त्यांनी पुन्हा एकदा उपोषणाचे हत्यार उपासले आहे. त्यामुळे आता त्यांच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मनधरणीचे प्रयत्न सुरू मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आज मध्यरात्री पासून पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर निवडणुकीच्या आधी सरकारला घेरण्याची मनोज जरांगे पाटील यांनी योजना आहे. 16 ‎सप्टेंबरला रात्री 12 वाजेपासून ते पुन्हा‎ एकदा आंतरवाली सराटीत उपोषणाला‎ बसणार आहेत. त्या आधीच सरकारच्या वतीने त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरु करण्यात आले आहे. मात्र, त्यांना अद्याप यश आलेले नाही. भुमरे ‎यांची जरांगेंसोबत 2 तास चर्चा‎ छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदिपान‎भुमरे यांनी रविवारी आंतरवाली सराटीत ‎मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली. दोघा‎ नेत्यांमध्ये अडीच तास चर्चा झाली. 16 ‎सप्टेंबरला रात्री 12 वाजेपासून जरांगे पुन्हा‎ एकदा आंतरवाली सराटीत उपोषणाला‎ बसणार आहेत. तसेच यापूर्वी जरांगे यांनी ‎खासदार संदिपान भुमरे यांच्यावर नाराजी‎ व्यक्त केली होती. त्या अनुषंगाने संदिपान ‎भुमरे यांनी जरांगे यांची भेट घेत नाराजी दूर‎ केल्याचे समोर आले. या भेटीत दोघा ‎नेत्यांमधील चर्चेचा तपशील जाहीर झालेला ‎नाही खासदार संदिपान भुमरे यांनी अचानकपणे आंतरवाली सराटी गाठल्याने राजकीय ‎वर्तुळाच चर्चा झाली. जरांगे पाटील यांची भेट ‎मी नेहमीच भेट घेतो. या आधी जेव्हा जरांगे‎ उपोषणाला बसले होते, त्या वेळीही मी त्यांची‎भेट घेतली होती. समाजाच्या हितावर आमची‎चर्चा झाली, असे भुमरे म्हणाले.‎  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment