मनोज जरांगे म्हणतील त्या उमेदवाराला होणार मराठा मतदान:आरक्षणाला विरोध करणाऱ्यांचा सुपडासाप करण्याचा फिरतोय संदेश

मनोज जरांगे म्हणतील त्या उमेदवाराला होणार मराठा मतदान:आरक्षणाला विरोध करणाऱ्यांचा सुपडासाप करण्याचा फिरतोय संदेश

मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी सकल मराठा समाज एकसंघ झाला आहे. लोकसभेत त्याचा रोष मतातून स्पष्टपणे उमटला. आता विधानसभेतही त्याच धर्तीवर मतदान करण्याचा निर्धार होत आहे. मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे आता तो आदेश देतील त्या उमेदवाराला एकठ्ठा मतदान करणे व मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या उमेदवारांना पाडण्यासाठी मराठा समाजाच्या वतीने मोहिम राबवली जाणार आहे. मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांचा सुपडासाप करण्याचा मेसेज सोशलमिडियावर जोरदार व्हायरल करण्यात येत आहेत. त्याला लाईक देखील मिळत आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत मराठा फॅक्टरचा परिणाम दिसून येणार असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागावा, यासाठी सकल मराठा समाज एकसंघ झालेला आहे. मात्र, सरकारच्या वतीने वेळोवेळी फसवणूक झाली आहे. यात शिंदे-फडणवीस, उद्धव- फडणवीस, चव्हाण, राणे, पवार या सर्वांच्या सरकारचा समावेश होता. मराठा आरक्षणात खोडा घालणाऱ्या, मराठा आंदोलनाला नाव ठेवणाऱ्या नेत्यांवर सकल मराठा समाजाचा प्रचंड रोष आहे. तसेच मराठा विरुद्ध ओबीसी, इतर समाज असा वाद निर्माण करणाऱ्या नेत्यांवरही तेवढच राग असून त्यांना पाडण्यासाठी विशेष व्यूव्हरचना आखली जात आहे. त्या नेत्याचे नाव व त्यांनी केलेले विधान पोस्ट करून यांचा सुपडा साफ करा व आपली ताकद दाखवून द्यावी, अशा पद्धतीने सकल मराठा समाजाला मराठा तरूण आव्हान करत आहेत. तर मनोज जरांगे यांनी देखील हिच भूमिका घेतलेली आहे. मताच्या ताकदीतून त्याचे चोख उत्तर देण्यासाठी १० नोव्हेंबरपासून प्रत्येक मतदार संघातील गावा गावात मोहिम राबवण्याचे अभियान सुरू होत आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment