नाशिकमध्ये‎ मनसेची आयारामांवरच मदार‎:शहरातील 4 जागांसाठी मुलाखतीस माेजकेच इच्छुक‎

नाशिकमध्ये‎ मनसेची आयारामांवरच मदार‎:शहरातील 4 जागांसाठी मुलाखतीस माेजकेच इच्छुक‎

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी‎राज्यभरात इच्छुकांची चाचपणी करणाऱ्या‎आणि जातील तिथे उमेदवार घेाषित करणाऱ्या ‎‎मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांचा, एकेकाळी‎पक्षाचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या ‎‎नाशिकमध्ये मात्र उमेदवारांची घाेषणा तर दूरच ‎‎इच्छूक देखील माेजकेच आल्याने, चांगलाच ‎‎हिरमाेड झाल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे,‎प्रत्येक दाैऱ्यात माध्यमांशी संवाद साधणाऱ्या‎ठाकरे यांनी माध्यमांपासूनही अंतर राखत उत्तर ‎‎महाराष्ट्रातून आलेल्या पदाधिकाऱ्यांशी चर्चेचा ‎‎साेपस्कार पार पाडला. या बैठकीत मात्र, इतर ‎‎पक्षातून मनसेत येणाऱ्या तुल्यबळ नेत्याला‎उमेदवारी देण्यावरही विचार हाेऊ शकताे, असे ‎‎फर्मानच त्यांनी पदाधिकाऱ्यांना काढल्याने ‎‎अायारामांचीच प्रतीक्षा करावी लागणार, असे ‎चित्र आहे.‎ विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी‎सत्ताधारी शिवसेना-भाजपाकडून व विराेधी ‎‎पक्षातील महाविकास आघाडीतील तीनही‎घटक पक्षांकडून नाशिकमध्ये इच्छुक‎उमेदवारांची चाचपणी करण्यात आली. यासाठी ‎‎काँग्रेसने तर इच्छुकांच्या मुलाखतीही घेतल्या ‎‎आहेत. यात आता मनसेनेही यंदा निवडणूक ‎‎लढविण्याच्या दृष्टीने चाचपणी सुरू केली आहे. ‎‎यासाठी पक्षप्रमुख राज ठाकरे हे स्वत: दाखल‎झाले. रविवारी (दि. ६) शहरातील एका‎हाॅटेलमध्ये सकाळी १० ते दुपारी ४ अशा सहा तासांच्या कालावधीत‎ ठाकरे यांनी जिल्ह्यासह धुळे,‎जळगाव, नंदूरबार व अहमदनगर जिल्ह्यातील‎प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून आढावा घेतला.‎यात शहरातील चारही मतदारसंघांत ‎निवडणूक लढवण्याचा ठाम निर्धारही त्यांनी ‎पदाधिकाऱ्यांसमाेर व्यक्त केला. ‎इच्छुकांकडून त्यांच्या विधानसभा ‎मतदारसंघातील सध्याची परिस्थिती विचारात ‎घेता तेथील जातीय समीकरण, लाेकसभा ‎निवडणुकीत असलेली परिस्थिती याची‎ माहिती घेण्यात आली.‎
या इच्छुकांनी दर्शवली तयारी‎ पूर्व मतदारसंघातून माजी महापाैर‎अशाेक मुर्तडक, प्रसाद सानप, पश्चिम‎मतदार संघातून सुदाम काेंबडे, दिलीप‎दातीर, मध्य नाशिकमधून सुजाता डेरे,‎अंकुश पवार, तर देवळालीतून रोहिणी‎जाधव, प्रमाेद साखरे, धरम गाेविंद‎यांनी उमेदवारीसाठी ठाकरे यांच्याकडे‎तयारी दर्शवली. जिल्ह्यातील मालेगाव‎मध्य, बागलाण तालुका वगळता‎प्रत्येक मतदारसंघातून दाेघे इच्छुक‎आहेत. मनसेचे नेते अविनाश‎अभ्यंकर, अनिल शिदाेरे, राज्य‎उपाध्यक्ष सलीम शेख आदी उपस्थित‎हाेेते.‎
उ. महाराष्ट्रातील ४७ पैकी‎४० जागा लढण्याची तयारी‎
विधानसभा निवडणुकीसाठी उत्तर‎महाराष्ट्रातील ४७ मतदारसंघांचा‎आढावा घेताना ठाकरे यांनी इच्छुकांशी‎तसेच पक्षाच्या निरीक्षकांनी‎मतदारसंघनिहाय प्रत्यक्ष जाऊन तयार‎केलेल्या अहवालावर चर्चा केली.‎त्यानुसार ४७ पैकी ४० जागा लढण्याची‎व याठिकाणी तुल्यबळ उमेदवार देण्याची‎तयारी निरीक्षकांसह इच्छुकांनी ठाकरे‎यांच्यासमेार व्यक्त केली.‎ बालेकिल्ल्यात माेजकेच इच्छुक‎ मनसेच्या स्थापनेनंतर झालेल्या सन २००९च्या‎विधानसभा निवडणुकीत राज्यभरातून १२‎आमदार पक्षाचे निवडून आले हाेते. यामध्ये‎एकट्या नाशिकमधून तीन उमेदवार विजयी‎झाले हाेते. त्यापाठाेपाठ महापालिकेतही सत्ता‎मिळवण्यात यश आल्याने पक्षाचा‎बालेकिल्ला मानला जात हाेता. मात्र, पक्षाची‎निवडणूक लढण्याची तयारी करून ऐनवेळी‎इतर पक्षांना पाठिंबा देण्याच्या धाेरणामुळे‎पक्षाची माेठी पडझड झाल्याचे दिसून येते.‎त्याचाच फटका नाशिकमध्येही बसला असून‎गेल्या निवडणुकीत शहरातील चारपैकी तीन‎जागा स्वबळावर लढणाऱ्या मनसेकडे यंदा‎प्रत्येक मतदारसंघासाठी दाेन-ते तीनच‎इच्छुक आले आहेत. त्यामुळे ठाकरे यांनी‎पदाधिकाऱ्यांना इतर सत्ताधारी अथवा‎विराेधकांमधील तुल्यबळ असणाऱ्या‎उमेदवाराला त्या पक्षाने नाकारले तर मनसेतून‎उमेदवारी देण्याचा विचार हाेऊ शकताे, असे‎संकेत दिले आहेत. यावरून मनसेची‎आयारामांचवर भिस्त असल्याची चर्चा‎आहे.‎

​आगामी विधानसभा निवडणुकीसाठी‎राज्यभरात इच्छुकांची चाचपणी करणाऱ्या‎आणि जातील तिथे उमेदवार घेाषित करणाऱ्या ‎‎मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांचा, एकेकाळी‎पक्षाचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या ‎‎नाशिकमध्ये मात्र उमेदवारांची घाेषणा तर दूरच ‎‎इच्छूक देखील माेजकेच आल्याने, चांगलाच ‎‎हिरमाेड झाल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे,‎प्रत्येक दाैऱ्यात माध्यमांशी संवाद साधणाऱ्या‎ठाकरे यांनी माध्यमांपासूनही अंतर राखत उत्तर ‎‎महाराष्ट्रातून आलेल्या पदाधिकाऱ्यांशी चर्चेचा ‎‎साेपस्कार पार पाडला. या बैठकीत मात्र, इतर ‎‎पक्षातून मनसेत येणाऱ्या तुल्यबळ नेत्याला‎उमेदवारी देण्यावरही विचार हाेऊ शकताे, असे ‎‎फर्मानच त्यांनी पदाधिकाऱ्यांना काढल्याने ‎‎अायारामांचीच प्रतीक्षा करावी लागणार, असे ‎चित्र आहे.‎ विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी‎सत्ताधारी शिवसेना-भाजपाकडून व विराेधी ‎‎पक्षातील महाविकास आघाडीतील तीनही‎घटक पक्षांकडून नाशिकमध्ये इच्छुक‎उमेदवारांची चाचपणी करण्यात आली. यासाठी ‎‎काँग्रेसने तर इच्छुकांच्या मुलाखतीही घेतल्या ‎‎आहेत. यात आता मनसेनेही यंदा निवडणूक ‎‎लढविण्याच्या दृष्टीने चाचपणी सुरू केली आहे. ‎‎यासाठी पक्षप्रमुख राज ठाकरे हे स्वत: दाखल‎झाले. रविवारी (दि. ६) शहरातील एका‎हाॅटेलमध्ये सकाळी १० ते दुपारी ४ अशा सहा तासांच्या कालावधीत‎ ठाकरे यांनी जिल्ह्यासह धुळे,‎जळगाव, नंदूरबार व अहमदनगर जिल्ह्यातील‎प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून आढावा घेतला.‎यात शहरातील चारही मतदारसंघांत ‎निवडणूक लढवण्याचा ठाम निर्धारही त्यांनी ‎पदाधिकाऱ्यांसमाेर व्यक्त केला. ‎इच्छुकांकडून त्यांच्या विधानसभा ‎मतदारसंघातील सध्याची परिस्थिती विचारात ‎घेता तेथील जातीय समीकरण, लाेकसभा ‎निवडणुकीत असलेली परिस्थिती याची‎ माहिती घेण्यात आली.‎
या इच्छुकांनी दर्शवली तयारी‎ पूर्व मतदारसंघातून माजी महापाैर‎अशाेक मुर्तडक, प्रसाद सानप, पश्चिम‎मतदार संघातून सुदाम काेंबडे, दिलीप‎दातीर, मध्य नाशिकमधून सुजाता डेरे,‎अंकुश पवार, तर देवळालीतून रोहिणी‎जाधव, प्रमाेद साखरे, धरम गाेविंद‎यांनी उमेदवारीसाठी ठाकरे यांच्याकडे‎तयारी दर्शवली. जिल्ह्यातील मालेगाव‎मध्य, बागलाण तालुका वगळता‎प्रत्येक मतदारसंघातून दाेघे इच्छुक‎आहेत. मनसेचे नेते अविनाश‎अभ्यंकर, अनिल शिदाेरे, राज्य‎उपाध्यक्ष सलीम शेख आदी उपस्थित‎हाेेते.‎
उ. महाराष्ट्रातील ४७ पैकी‎४० जागा लढण्याची तयारी‎
विधानसभा निवडणुकीसाठी उत्तर‎महाराष्ट्रातील ४७ मतदारसंघांचा‎आढावा घेताना ठाकरे यांनी इच्छुकांशी‎तसेच पक्षाच्या निरीक्षकांनी‎मतदारसंघनिहाय प्रत्यक्ष जाऊन तयार‎केलेल्या अहवालावर चर्चा केली.‎त्यानुसार ४७ पैकी ४० जागा लढण्याची‎व याठिकाणी तुल्यबळ उमेदवार देण्याची‎तयारी निरीक्षकांसह इच्छुकांनी ठाकरे‎यांच्यासमेार व्यक्त केली.‎ बालेकिल्ल्यात माेजकेच इच्छुक‎ मनसेच्या स्थापनेनंतर झालेल्या सन २००९च्या‎विधानसभा निवडणुकीत राज्यभरातून १२‎आमदार पक्षाचे निवडून आले हाेते. यामध्ये‎एकट्या नाशिकमधून तीन उमेदवार विजयी‎झाले हाेते. त्यापाठाेपाठ महापालिकेतही सत्ता‎मिळवण्यात यश आल्याने पक्षाचा‎बालेकिल्ला मानला जात हाेता. मात्र, पक्षाची‎निवडणूक लढण्याची तयारी करून ऐनवेळी‎इतर पक्षांना पाठिंबा देण्याच्या धाेरणामुळे‎पक्षाची माेठी पडझड झाल्याचे दिसून येते.‎त्याचाच फटका नाशिकमध्येही बसला असून‎गेल्या निवडणुकीत शहरातील चारपैकी तीन‎जागा स्वबळावर लढणाऱ्या मनसेकडे यंदा‎प्रत्येक मतदारसंघासाठी दाेन-ते तीनच‎इच्छुक आले आहेत. त्यामुळे ठाकरे यांनी‎पदाधिकाऱ्यांना इतर सत्ताधारी अथवा‎विराेधकांमधील तुल्यबळ असणाऱ्या‎उमेदवाराला त्या पक्षाने नाकारले तर मनसेतून‎उमेदवारी देण्याचा विचार हाेऊ शकताे, असे‎संकेत दिले आहेत. यावरून मनसेची‎आयारामांचवर भिस्त असल्याची चर्चा‎आहे.‎  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment