मराठा आरक्षण:संभाजीनगरात राजश्री उमरे यांचे उपोषण मागे; मुख्यमंत्री शिंदे तुमच्याच समाजाचे, शेवट गोड होईल- मंत्री केसरकर

मराठा आरक्षण:संभाजीनगरात राजश्री उमरे यांचे उपोषण मागे; मुख्यमंत्री शिंदे तुमच्याच समाजाचे, शेवट गोड होईल- मंत्री केसरकर

मराठा आरक्षणासाठी गेल्या ४४ वर्षांपासून लढा सुरू आहे, परंतु आतापर्यंत सर्व केंद्र आणि राज्य सरकारांनी मराठा समाजाला आरक्षणासाठी खेळवत ठेवले. याचीच पुनरावृत्ती रविवारी (१५ सप्टेंबर) आरक्षणासाठी गेल्या १४ दिवसांपासून राजश्री उमरे यांचे क्रांती चौकात उपोषण सुरू होते. त्यांना दोन आठवड्यांत निर्णयाचे आश्वासन देऊन सरकारने उपोषण सोडवले. ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तुमच्याच समाजाचे आहेत, शेवट नक्की गोड होईल,’ असे आश्वासन शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिले. मुख्यमंत्री हे संवैधानिक पद असून ते राज्यातील नागरिकांचे प्रतिनिधित्व करतात. केसरकरांच्या वक्तव्यामुळे नवीन वाद उभा राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, ईडब्ल्यूएस आरक्षण लागू करावे, मराठवाड्यासाठी हैदराबाद गॅझेट लागू करावे यांसह २१ मागण्यांसाठी धर्मवीर संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या प्रदेशाध्यक्ष राजश्री उमरे यांनी २ सप्टेंबरपासून क्रांती चौकात आमरण उपोषणाला सुरुवात केली होती. रविवारी त्यांच्या उपोषणाचा चौदावा दिवस होता. उपोषणार्थी उमरे यांच्या शिष्टमंडळाने मुंबईत जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली होती.
त्यानंतर शिक्षणमंत्री दीपक केसरकर, पालकमंत्री अब्दुल सत्तार, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी उमरे यांची रविवारी रात्री साडेआठ वाजता भेट घेऊन चर्चा केली. या वेळी मुख्यमंत्री यांच्या शिष्टमंडळाने मराठवाड्यासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्याची मागणी पुढील दोन आठवड्यांत पूर्ण केली जाईल. या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आणि उमरे यांना एकत्र बसवून निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन केसरकर यांनी दिले. त्यानंतर उमरे यांना फळांचा रस पाजून उपोषण सोडवले.
क्रांती चौकाला छावणीचे स्वरूप क्रांती चौकात सायंकाळी चारपासून पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात केला होता. पोलिस उपायुक्त नितीन बगाटे, विशेष शाखेचे अविनाश आघाव, क्रांती चौक ठाण्याचे निरीक्षक माने यांची उपस्थिती होती. जवळपास या वेळी ५० पोलिस बंदोबस्तासाठी तैनात केले होते.

​मराठा आरक्षणासाठी गेल्या ४४ वर्षांपासून लढा सुरू आहे, परंतु आतापर्यंत सर्व केंद्र आणि राज्य सरकारांनी मराठा समाजाला आरक्षणासाठी खेळवत ठेवले. याचीच पुनरावृत्ती रविवारी (१५ सप्टेंबर) आरक्षणासाठी गेल्या १४ दिवसांपासून राजश्री उमरे यांचे क्रांती चौकात उपोषण सुरू होते. त्यांना दोन आठवड्यांत निर्णयाचे आश्वासन देऊन सरकारने उपोषण सोडवले. ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तुमच्याच समाजाचे आहेत, शेवट नक्की गोड होईल,’ असे आश्वासन शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिले. मुख्यमंत्री हे संवैधानिक पद असून ते राज्यातील नागरिकांचे प्रतिनिधित्व करतात. केसरकरांच्या वक्तव्यामुळे नवीन वाद उभा राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, ईडब्ल्यूएस आरक्षण लागू करावे, मराठवाड्यासाठी हैदराबाद गॅझेट लागू करावे यांसह २१ मागण्यांसाठी धर्मवीर संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या प्रदेशाध्यक्ष राजश्री उमरे यांनी २ सप्टेंबरपासून क्रांती चौकात आमरण उपोषणाला सुरुवात केली होती. रविवारी त्यांच्या उपोषणाचा चौदावा दिवस होता. उपोषणार्थी उमरे यांच्या शिष्टमंडळाने मुंबईत जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली होती.
त्यानंतर शिक्षणमंत्री दीपक केसरकर, पालकमंत्री अब्दुल सत्तार, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी उमरे यांची रविवारी रात्री साडेआठ वाजता भेट घेऊन चर्चा केली. या वेळी मुख्यमंत्री यांच्या शिष्टमंडळाने मराठवाड्यासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्याची मागणी पुढील दोन आठवड्यांत पूर्ण केली जाईल. या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आणि उमरे यांना एकत्र बसवून निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन केसरकर यांनी दिले. त्यानंतर उमरे यांना फळांचा रस पाजून उपोषण सोडवले.
क्रांती चौकाला छावणीचे स्वरूप क्रांती चौकात सायंकाळी चारपासून पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात केला होता. पोलिस उपायुक्त नितीन बगाटे, विशेष शाखेचे अविनाश आघाव, क्रांती चौक ठाण्याचे निरीक्षक माने यांची उपस्थिती होती. जवळपास या वेळी ५० पोलिस बंदोबस्तासाठी तैनात केले होते.  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment