मराठा आरक्षणावरील निर्णय महायुती सरकारने घेतले:कायद्याच्या चौकटीत जे बसेल ते सर्व करू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आश्वासन
मराठा आरक्षणावरील जे काही निर्णय घेतले आहेत ते महायुती सरकारने घेतले आहेत. तसेच कायद्याच्या चौकटीमध्ये जे काही बसेल ते सगळं आम्ही करणार आहोत, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. प्रचार रॅलीवेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. दिल्लीतील महाराष्ट्र भवनातील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यालयाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. तसेच दिल्लीच्या निवडणुका जवळ आल्या असून त्यात भाजपच्या प्रचारासाठी फडणवीस सध्या दिल्लीमध्ये आहेत. यावेळी पत्रकांशी बोलताना त्यांना मराठा आरक्षणावर प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी सांगितले की, मराठा आरक्षणावरील जे काही निर्णय घेतले आहेत ते महायुती सरकारने घेतले आहेत. तसेच कायद्याच्या चौकटीमध्ये जे काही बसेल ते सगळं आम्ही करणार आहोत. मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा महाराष्ट्रात पेटला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे 6 दिवस उपोषण देखील केले. आज त्यांनी उपोषण मागे घेतले आहे, यावेळी भाजप आमदार सुरेश धस उपस्थित होते. तसेच सुरेश धस यांच्या हातून मनोज जरांगे यांनी ज्यूस पीत उपोषण सोडले आहे. यावेळी बीडचे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनावणे देखील उपस्थित होते. आमदार सुरेश धस व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी मनोज जरांगे यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी मनोज जरांगे यांनी केलेल्या 8 मागण्यांपैकी 4 मागण्यांवर सरकार सकारात्मक असल्याचे सुरेश धस यांनी सांगितले. या सरकारकडून आमच्या मागण्या होणार नसतील, तर आम्हाला मुंबईला जावेच लागेल, त्याची तारीख लवकरच घोषित करू, असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला. मनोज जरांगेंच्या कोणत्या मागण्या मान्य? मनोज जरांगे यांनी 8 मागण्या मांडल्या होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 4 मागण्यांवर सकारात्मकता दाखवली आहे, असे सुरेश धस यांनी सांगितले.