मराठवाड्यात 4.32 लाख लाडक्या‎बहिणींचे पैसे ई-केवायसीत अडकले:ऊन पावसात बँकांसमोर सकाळपासून लागतात महिलांच्या रांगा‎

मराठवाड्यात 4.32 लाख लाडक्या‎बहिणींचे पैसे ई-केवायसीत अडकले:ऊन पावसात बँकांसमोर सकाळपासून लागतात महिलांच्या रांगा‎

मराठवाड्यात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’‎योजनेमध्ये तब्बल ४.३२ लाख महिलांचे बँक खाते, ‎‎आधारसोबत लिंक नसल्याने, योजनेचा लाभ त्यांना ‎‎मिळवण्याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे‎आधार लिंक करण्यासाठी लाडक्या बहिणींच्या‎बँकांसमोर उन्हा-पावसात रांगा लागत आहेत. तर‎दुसरीकडे जिल्हा प्रशासनाने याबाबत बँकांशी समन्वय‎साधावा, अशा सूचना विभागीय आयुक्त कार्यालयाने‎दिल्या आहेत.‎ लाडकी बहीण योजनेमध्ये दरमहा दीड हजार रुपये‎त्यांच्या बँक खात्यात जमा केले जात आहेत. त्यानुसार‎महिलांनी नारीदूत ॲप किंवा लाडकी बहीण योजनेच्या‎वेबसाईटवर नोंदणी केली. ऑनलाइन व आॅफलाइन‎आलेल्या अर्जांची तपासणी होऊन पात्र महिलांच्या बँक‎खात्यात रक्कम जमा केली जात आहे. मात्र त्यासाठी‎बँक खात्याला आधार लिंक असणे गरजेचे आहे. मात्र‎ मराठवाड्यात तब्बल ४.३२ लाख महिलांचे बँक खाते‎आधार लिंक नसल्यामुळे त्यांच्या बँक खात्यात रक्कम‎जमाच झाली नाही. त्यामुळे आता आधार लिंक‎करण्यासाठी महिलांची बँकांसमोर गर्दी होऊ लागली‎आहे. हिंगोली शहरात स्टेट बँक सुरु होण्यापूर्वीच‎महिलांच्या बँकेसमोर रांगा लागतात. महिलांची होणारी‎गर्दी लक्षात घेऊन पोलिस प्रशासनाने गृहरक्षक दलातील‎महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मराठवाड्यात‎अनेक बँकांमध्ये अशी परिस्थिती कायम आहे.‎ आधार लिंक‎ नसलेल्या महिला‎ जिल्हा संख्या‎
हिंगोली २५,२९३‎
संभाजीनगर ८५,२८९‎
जालना ४१,०७१‎
बीड ५३,०१७‎
परभणी ३८,२२४‎
नांदेड ७०,१४१‎
लातूर ८६,३५३‎
धाराशिव ३२,९६५‎ थेट सवाल‎ प्रवीण ठाकरे, व्यवस्थापक, स्टेट बँक, शाखा हिंगोली‎
Q ई-केवायसीसाठी वेळ का लागतो ?‎
A जिल्ह्यात बहुतेक महिला खातेदारांनी मागील सहा‎महिन्यांपासून बँकेचे व्यवहार केले नाहीत. त्यामुळे त्यांची‎बँक खाते ॲक्टिव्ह करून मगच ई केवायसी करावी‎लागत आहे. त्यासाठी वेळ लागत आहे.‎

Q ई-केवायसीची प्रक्रिया कशी आहे?‎
A ई-केवायसीसाठी सुरुवातीला महिला खातेदारांची‎केवायसी करावी लागते, त्यानंतर आधार लिंक केले जाते.‎तिसऱ्या वेळी ईपीएस झाल्यानंतर ई-केवायसीची प्रक्रिया‎पूर्ण होते. बँकेत तीन टेबलांवर ही प्रक्रिया करावी लागते.‎

Q गर्दी कमी करण्यासाठी काय नियोजन?‎
A बँकेसमोर महिलांची गर्दी होत आहे त्यामुळे बँकांकडून‎दररोज शक्य होतील तेवढ्याच महिला खातेदारांना‎बोलवले जाते. उर्वरित महिलांना दुसऱ्या दिवशी येण्याची‎सूचना दिली जात आहे. लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण‎करण्याचे बँकेचे प्रयत्न आहेत.‎

​मराठवाड्यात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’‎योजनेमध्ये तब्बल ४.३२ लाख महिलांचे बँक खाते, ‎‎आधारसोबत लिंक नसल्याने, योजनेचा लाभ त्यांना ‎‎मिळवण्याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे‎आधार लिंक करण्यासाठी लाडक्या बहिणींच्या‎बँकांसमोर उन्हा-पावसात रांगा लागत आहेत. तर‎दुसरीकडे जिल्हा प्रशासनाने याबाबत बँकांशी समन्वय‎साधावा, अशा सूचना विभागीय आयुक्त कार्यालयाने‎दिल्या आहेत.‎ लाडकी बहीण योजनेमध्ये दरमहा दीड हजार रुपये‎त्यांच्या बँक खात्यात जमा केले जात आहेत. त्यानुसार‎महिलांनी नारीदूत ॲप किंवा लाडकी बहीण योजनेच्या‎वेबसाईटवर नोंदणी केली. ऑनलाइन व आॅफलाइन‎आलेल्या अर्जांची तपासणी होऊन पात्र महिलांच्या बँक‎खात्यात रक्कम जमा केली जात आहे. मात्र त्यासाठी‎बँक खात्याला आधार लिंक असणे गरजेचे आहे. मात्र‎ मराठवाड्यात तब्बल ४.३२ लाख महिलांचे बँक खाते‎आधार लिंक नसल्यामुळे त्यांच्या बँक खात्यात रक्कम‎जमाच झाली नाही. त्यामुळे आता आधार लिंक‎करण्यासाठी महिलांची बँकांसमोर गर्दी होऊ लागली‎आहे. हिंगोली शहरात स्टेट बँक सुरु होण्यापूर्वीच‎महिलांच्या बँकेसमोर रांगा लागतात. महिलांची होणारी‎गर्दी लक्षात घेऊन पोलिस प्रशासनाने गृहरक्षक दलातील‎महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मराठवाड्यात‎अनेक बँकांमध्ये अशी परिस्थिती कायम आहे.‎ आधार लिंक‎ नसलेल्या महिला‎ जिल्हा संख्या‎
हिंगोली २५,२९३‎
संभाजीनगर ८५,२८९‎
जालना ४१,०७१‎
बीड ५३,०१७‎
परभणी ३८,२२४‎
नांदेड ७०,१४१‎
लातूर ८६,३५३‎
धाराशिव ३२,९६५‎ थेट सवाल‎ प्रवीण ठाकरे, व्यवस्थापक, स्टेट बँक, शाखा हिंगोली‎
Q ई-केवायसीसाठी वेळ का लागतो ?‎
A जिल्ह्यात बहुतेक महिला खातेदारांनी मागील सहा‎महिन्यांपासून बँकेचे व्यवहार केले नाहीत. त्यामुळे त्यांची‎बँक खाते ॲक्टिव्ह करून मगच ई केवायसी करावी‎लागत आहे. त्यासाठी वेळ लागत आहे.‎

Q ई-केवायसीची प्रक्रिया कशी आहे?‎
A ई-केवायसीसाठी सुरुवातीला महिला खातेदारांची‎केवायसी करावी लागते, त्यानंतर आधार लिंक केले जाते.‎तिसऱ्या वेळी ईपीएस झाल्यानंतर ई-केवायसीची प्रक्रिया‎पूर्ण होते. बँकेत तीन टेबलांवर ही प्रक्रिया करावी लागते.‎

Q गर्दी कमी करण्यासाठी काय नियोजन?‎
A बँकेसमोर महिलांची गर्दी होत आहे त्यामुळे बँकांकडून‎दररोज शक्य होतील तेवढ्याच महिला खातेदारांना‎बोलवले जाते. उर्वरित महिलांना दुसऱ्या दिवशी येण्याची‎सूचना दिली जात आहे. लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण‎करण्याचे बँकेचे प्रयत्न आहेत.‎  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment