मायावतींनी भाच्यास 2 वेळेस वारस केले; दोनदा हटवले:आकाश आनंद यांची पुन्हा सर्व पदे काढली

बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी रविवारी लखनऊत राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावली. या बैठकीत मायावती यांनी बसपचे राष्ट्रीय समन्वयकपद भूषविलेल्या आकाश आनंद यांना सर्व पदांवरून हटवले. मायावती यांचे भाचे आकाश आनंद या बैठकीत सहभागी झाले नव्हते. आकाश आनंद बसपचे राष्ट्रीय समन्वयक होते. याआधी १५ फेब्रुवारीला मायावती यांनी आकाश आनंद यांचे सासरे अशोक सिद्धार्थ यांनाही पक्षातून काढले होते. अशोक सिद्धार्थनी पक्षाला कमकुवत केले : मायावती मायावती म्हणाल्या, मी जिवंत असेपर्यंत पक्षामध्ये माझा उत्तराधिकारी असणार नाही. माझ्यासाठी पक्ष आणि चळवळ आधी आहे. अशोक सिद्धार्थने पक्षाला दोन गटात विभागून पक्ष कमकुवत करण्याचे घृणास्पद काम काम केले आहे.