मी तुमच्यासारख्या चोऱ्या-माऱ्या केलेल्या नाहीत:सर्वांना माहीत आहे दिल्लीला जाऊन लोटांगण घातले, गिरीश महाजनांची खडसेंवर सडकून टीका

मी तुमच्यासारख्या चोऱ्या-माऱ्या केलेल्या नाहीत:सर्वांना माहीत आहे दिल्लीला जाऊन लोटांगण घातले, गिरीश महाजनांची खडसेंवर सडकून टीका

‘मी तुमच्यासारख्या चोऱ्या माऱ्या केलेल्या नाहीत. तुम्ही काय केलेले आहे हे सर्वांना माहीत आहे’, अशी सडकून टीका भाजप नेते व मंत्री गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर केली आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना गिरीश महाजन यांनी अनेक विषयांवर भाष्य केले आहे. तसेच उद्धव ठाकरेंवर देखील त्यांनी टीका केली आहे. एकनाथ खडसे यांच्यावर टीका करताना गिरीश महाजन म्हणाले, तुमच्याकडे चाललेले आहे ते सावरा मी तर काही तुमच्या सारख्या चोऱ्या माऱ्या केलेल्या नाहीत. तुम्ही काय काय केले आहे हे सर्वांना माहित आहे. मी महामार्गावर जागा घ्यायची आणि मुरूम चोराच्या गोष्टी कधीच करत नाही, अशी बोचरी टीका त्यांनी केली आहे. एकनाथ खडसे हे भाजपमध्ये प्रवेश करणार होते, यावर गिरीश महाजन म्हणाले, त्या बैठकीत गडकरी साहेब काय बोलले ते सांगू का म्हणा? संपूर्ण राज्याला माहीत आहे, जगाला माहीत आहे की कोण जेलमध्ये गेल्यावर दीड वर्ष वर्ष कोण राहिले. सर्वांना माहिती आहे की कोण दिल्लीला गेले, दिल्लीला जाऊन लोटांगण घालून माफ्या मागत आहे, अशा शब्दात महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावर टीका केली आहे. अजित पवार मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत यावर गिरीश महाजन यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांचे कौतुक केले होते. यावर ते म्हणाले की कौतुक केले आहे तर चांगले आहे. आमचे मुख्यमंत्री फार दिलदार आहेत. त्यांनी त्यांचे कौतुक केले तर वाईट काय, असे गिरीश महाजन म्हणाले. उद्धव ठाकरेंवर टीका करताना गिरीश महाजन म्हणाले, उद्धव ठाकरे यांनीच युती धर्म पाळला नाही. युतीमध्ये आम्ही सोबत निवडणूक लढवली. आमचे बहुमत आले आणि हे कॉंग्रेसच्या, पवारांचे मांडीवर जाऊन बसले, अशा शब्दात गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment