पद मिळाल्यावर माणसं बेताल होतात:संजयकाका पाटील यांची खासदार विशाल पाटलांवर टीका

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. कुठे दावे-प्रतिदावे होत आहेत तर कुठे आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. अशातच सांगली येथील भाजपचे माजी खासदार संजयकाका पाटील आणि विद्यमान खासदार विशाल पाटील यांच्यात शाब्दिक वार झाल्याचे समोर आले आहे. पद मिळाल्यावर माणसे बेताल होतात, अशी टीका भाजपचे माजी खासदार संजयकाका पाटील यांनी विद्यमान खासदार विशाल पाटील यांच्यावर केली आहे. तसेच मी माझ्या कौशल्यावर, हिंमतीवर पदे मिळवलेली आहेत, असेही त्यांनी म्हणले आहे. संजयकाका पाटील म्हणाले, अलीकडच्या काळात राजकीय जीवनामध्ये माणसाला पद, प्रतिष्ठा मिळाली की माणूस बेफाम होत चालला आहे. मिळालेले पद माझ्या कौशल्यावर, हिंमतीवर मिळवले असा भ्रम तयार होतोय, त्यामुळे माणसे बेताल होत आहेत. पण दिलेले पद लोकांनी कामासाठी दिलेले आहे याचा विसर पडतोय. याचे उदाहरण म्हणजे सांगलीचे नवनियुक्त खासदार आहेत, असे म्हणत खासदार विशाल पाटील यांच्यावर टीका केली आहे. काही दिवसांपूर्वी खासदार विशाल पाटील यांनी खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे संभाव्य उमेदवार सुहास बाबर यांना निवडणुकीत मदत करू, असा शब्द दिला होता. त्यानंतर तासगाव कवठेमहंकाळमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाच्या अजितराव घोरपडे यांना पाठिंबा जाहीर केला होता. तर आता त्यांनी याच मतदारसंघातून रोहित पाटील यांना पाठिंबा दिला आहे. त्यांच्या या सर्व वक्तव्यावरून माजी खासदार संजय पाटील यांनी टीका केली आहे. काय म्हणाले होते खासदार विशाल पाटील? विशाल पाटील म्हणाले, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तासगाव कवठेमहंकाळ मतदारसंघातून रोहित पाटील यांच्या रूपात आमदार निवडून द्यायचे आहे. रोहित पाटील टेंशन घेऊ नका राजकारण चालू राहत असते. रोहितच्या रूपाने चांगला आमदार देण्याची इच्छा शरद पवार यांनी बोलून दाखवली आहे. वसंतदादा कुटुंब रोहित पाटील यांच्यासोबत कायम उभा राहील. दरम्यान, तासगाव कवठेमहंकाळ मतदारसंघात रोहित पाटील आणि माजी खासदार संजयकाका पाटील यांचे सुपुत्र प्रभाकर पाटील यांनी निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे.

​आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. कुठे दावे-प्रतिदावे होत आहेत तर कुठे आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. अशातच सांगली येथील भाजपचे माजी खासदार संजयकाका पाटील आणि विद्यमान खासदार विशाल पाटील यांच्यात शाब्दिक वार झाल्याचे समोर आले आहे. पद मिळाल्यावर माणसे बेताल होतात, अशी टीका भाजपचे माजी खासदार संजयकाका पाटील यांनी विद्यमान खासदार विशाल पाटील यांच्यावर केली आहे. तसेच मी माझ्या कौशल्यावर, हिंमतीवर पदे मिळवलेली आहेत, असेही त्यांनी म्हणले आहे. संजयकाका पाटील म्हणाले, अलीकडच्या काळात राजकीय जीवनामध्ये माणसाला पद, प्रतिष्ठा मिळाली की माणूस बेफाम होत चालला आहे. मिळालेले पद माझ्या कौशल्यावर, हिंमतीवर मिळवले असा भ्रम तयार होतोय, त्यामुळे माणसे बेताल होत आहेत. पण दिलेले पद लोकांनी कामासाठी दिलेले आहे याचा विसर पडतोय. याचे उदाहरण म्हणजे सांगलीचे नवनियुक्त खासदार आहेत, असे म्हणत खासदार विशाल पाटील यांच्यावर टीका केली आहे. काही दिवसांपूर्वी खासदार विशाल पाटील यांनी खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे संभाव्य उमेदवार सुहास बाबर यांना निवडणुकीत मदत करू, असा शब्द दिला होता. त्यानंतर तासगाव कवठेमहंकाळमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाच्या अजितराव घोरपडे यांना पाठिंबा जाहीर केला होता. तर आता त्यांनी याच मतदारसंघातून रोहित पाटील यांना पाठिंबा दिला आहे. त्यांच्या या सर्व वक्तव्यावरून माजी खासदार संजय पाटील यांनी टीका केली आहे. काय म्हणाले होते खासदार विशाल पाटील? विशाल पाटील म्हणाले, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तासगाव कवठेमहंकाळ मतदारसंघातून रोहित पाटील यांच्या रूपात आमदार निवडून द्यायचे आहे. रोहित पाटील टेंशन घेऊ नका राजकारण चालू राहत असते. रोहितच्या रूपाने चांगला आमदार देण्याची इच्छा शरद पवार यांनी बोलून दाखवली आहे. वसंतदादा कुटुंब रोहित पाटील यांच्यासोबत कायम उभा राहील. दरम्यान, तासगाव कवठेमहंकाळ मतदारसंघात रोहित पाटील आणि माजी खासदार संजयकाका पाटील यांचे सुपुत्र प्रभाकर पाटील यांनी निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे.  

Share