कर्नाटकमध्ये मिरवणुकीत हिंसाचार:जाळपोळप्रकरणी 52 अटकेत, समाजकंटकांनी अनेक वाहने पेटवली

कर्नाटकच्या मांड्या येथील नागमंगला येथे गणपती मिरवणुकीत हिंसाचार भडकला. त्यानंतर पोलिसांनी ५२ जणांना ताब्यात घेतले. मिरवणुकीदरम्यान दोन गटांत वाद झाला. त्यानंतर काही समाजकंटकांनी दगडफेक केली. त्यामुळे तणाव निर्माण झाला. दोन गटांच्या धुमश्चक्रीनंतर समाजकंटकांनी दुकानांची तोडफोड केली. वाहनांना आग लावली. त्यात जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. प्रशासनाने १४ सप्टेंबरपर्यंत या भागात जमावबंदी आदेश लागू केले आहेत.सोबतच अतिरिक्त सुरक्षा दलास तैनात करण्यात आले. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ‘हिंसाचार काँग्रेसच्या तुष्टीकरणाचा परिणाम’ केंद्रीय श्रम व रोजगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी हिंसाचाराची घटना म्हणजे काँग्रेसच्या तुष्टिकरणाचा परिणाम असल्याचे म्हटले आहे. हिंसाचाराच्या तपासात एनआयएला देखील समाविष्ट करायला हवे. तरच सत्य समजू शकेल. हिंसाचारामागील मूळ काय आहे, हे समोर यायला हवे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment