मित्राच्या पत्नीस जीवे मारण्याची धमकी:महिला पोलिस शिपाई निलंबित

मित्राच्या पत्नीस जीवे मारण्याची धमकी:महिला पोलिस शिपाई निलंबित

मित्राच्या पत्नीला जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या पुणे पोलीस दलातील महिला पोलिस शिपायाला निलंबित करण्यात आले. अनघा सुनील ढवळे असे निलंबित करण्यात आलेल्या महिला पोलिस शिपायाचे नाव आहे. ढवळे हिच्या विरुद्ध कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. ढवळे कोथरूड वाहतूक विभागात नियुक्तीस होती. दोन महिन्यांपुर्वी ढवळेविरुद्ध गडहिंग्लज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. याबाबत ३१ वर्षीय महिलेने फिर्याद दिली होती. ‘मी पुण्यातील स्थानिक आहे. माझी गुंडांबरोबर ओळख आहे. मी एक सामाजिक संस्था चालविते. सामाजिक संस्थेच्या माध्यमातून काळा पैसा चलनात आणते. आमच्या संस्थेकडून नऊ कोटी रुपयांचा व्यवहार झाला. तुझ्या पतीला ४० ते ५० लाख रुपये मिळणार आहेत’, असे ढवळेने महिलेला सांगितले होते. ‘मी सांगेल तशी वागली नाही तर तुला ठार मारू’, अशी धमकी ढवळने महिलेला दिली होती. ढवळेविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर तिची खात्याअंतर्गत चौकशी करण्यात आली. त्यानंतर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी तिला पोलिस सेवेतून निलंबित करण्याचे आदेश दिले. चोरट्यांनी खासगी कंपनीतील कर्मचाऱ्यास धमकावत कार चोरली खासगी कंपनीतील कर्मचाऱ्यास पोलिस असल्याची बतावणी करून चोरट्यांनी कार चोरून नेल्याची घटना नगर रस्त्यावर घडली. याबाबत खासगी कंपनीतील कर्मचाऱ्याने लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार वाकड येथे राहायला आहेत. शनिवारी ते नगरला गेले होते. कंपनीतील काम आटोपून ते नगर रस्त्याने पुण्याकडे निघाले होते. वाटेत त्यांच्या कारचे चाक पंक्चर झाल्याने ते दुकान शोधत होते. त्यावेळी पाठीमागून आलेल्या कारमधून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांना अडवले. तुम्ही वापरत असलेली कार चोरीची आहे. पोलिस चौकीत चला, अशी धमकी चोरट्यांनी दिली. त्यानंतर चोरट्यांनी त्यांचा मोबाइल ताब्यात घेतला. चोरट्याबरोबर असलेल्या एका साथीदाराने तक्रारदाराच्या कारचा ताबा घेतला. त्यानंतर कार खराडी, मांजरी, कोलवडी, थेऊरमार्गे, गणेशनगर येथे नेली. तक्रारदाराला धमकावून कारमधून उतरण्यास सांगितले. त्यानंतर कार घेऊन चोरटे पसार झाले. त्यानंतर घाबरलेल्या तक्रारदार कार चालकाने पोलिसांकडे तक्रार दिली.

​मित्राच्या पत्नीला जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या पुणे पोलीस दलातील महिला पोलिस शिपायाला निलंबित करण्यात आले. अनघा सुनील ढवळे असे निलंबित करण्यात आलेल्या महिला पोलिस शिपायाचे नाव आहे. ढवळे हिच्या विरुद्ध कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. ढवळे कोथरूड वाहतूक विभागात नियुक्तीस होती. दोन महिन्यांपुर्वी ढवळेविरुद्ध गडहिंग्लज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. याबाबत ३१ वर्षीय महिलेने फिर्याद दिली होती. ‘मी पुण्यातील स्थानिक आहे. माझी गुंडांबरोबर ओळख आहे. मी एक सामाजिक संस्था चालविते. सामाजिक संस्थेच्या माध्यमातून काळा पैसा चलनात आणते. आमच्या संस्थेकडून नऊ कोटी रुपयांचा व्यवहार झाला. तुझ्या पतीला ४० ते ५० लाख रुपये मिळणार आहेत’, असे ढवळेने महिलेला सांगितले होते. ‘मी सांगेल तशी वागली नाही तर तुला ठार मारू’, अशी धमकी ढवळने महिलेला दिली होती. ढवळेविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर तिची खात्याअंतर्गत चौकशी करण्यात आली. त्यानंतर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी तिला पोलिस सेवेतून निलंबित करण्याचे आदेश दिले. चोरट्यांनी खासगी कंपनीतील कर्मचाऱ्यास धमकावत कार चोरली खासगी कंपनीतील कर्मचाऱ्यास पोलिस असल्याची बतावणी करून चोरट्यांनी कार चोरून नेल्याची घटना नगर रस्त्यावर घडली. याबाबत खासगी कंपनीतील कर्मचाऱ्याने लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार वाकड येथे राहायला आहेत. शनिवारी ते नगरला गेले होते. कंपनीतील काम आटोपून ते नगर रस्त्याने पुण्याकडे निघाले होते. वाटेत त्यांच्या कारचे चाक पंक्चर झाल्याने ते दुकान शोधत होते. त्यावेळी पाठीमागून आलेल्या कारमधून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांना अडवले. तुम्ही वापरत असलेली कार चोरीची आहे. पोलिस चौकीत चला, अशी धमकी चोरट्यांनी दिली. त्यानंतर चोरट्यांनी त्यांचा मोबाइल ताब्यात घेतला. चोरट्याबरोबर असलेल्या एका साथीदाराने तक्रारदाराच्या कारचा ताबा घेतला. त्यानंतर कार खराडी, मांजरी, कोलवडी, थेऊरमार्गे, गणेशनगर येथे नेली. तक्रारदाराला धमकावून कारमधून उतरण्यास सांगितले. त्यानंतर कार घेऊन चोरटे पसार झाले. त्यानंतर घाबरलेल्या तक्रारदार कार चालकाने पोलिसांकडे तक्रार दिली.  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment