वेळ पडल्यास आमदारकीचा राजीनामा देणार:मंत्रिपदाचे आश्वासन दिल्यानंतरही डावलल्याने पश्चाताप – आमदार नरेंद्र भोंडेकर

वेळ पडल्यास आमदारकीचा राजीनामा देणार:मंत्रिपदाचे आश्वासन दिल्यानंतरही डावलल्याने पश्चाताप – आमदार नरेंद्र भोंडेकर

मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने भंडारा येथील शिवसेना शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी नाराजी व्यक्त करत थेट उपनेते पदाचा राजीनामा दिला तसेच पूर्व विदर्भ समन्वयक पदाचा देखील त्यांनी राजीनामा दिला आहे. तसेच त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील आता टीका केली आहे. आमदार नरेंद्र भोंडेकर म्हणाले, मागील सत्ता स्थापनेच्या वेळी कोणत्याही अटी शर्ती विना मी शिंदेनं सोबत गेलो. त्यानंतर भाजपाचा आग्रह असतानाही शिवसेनेत प्रवेश केला. मात्र, शिवसेनेने आता मला मंत्रिपदाचे आश्वासन दिल्यानंतरही डावलल्याने शिवसेनेत गेल्याचा पश्चाताप होत असून वेळ पडल्यास आमदारकीचा राजीनामा देणार, असे भोंडेकर म्हणाले. पुढे बोलताना नरेंद्र भोंडेकर म्हणाले, मागील सरकारच्या वेळेस 10 अपक्ष आमदारांपैकी एकनाथ शिंदेंसोबत जाणारा सर्वात पहिला आमदार जाणारा मी होतो. भाजप – शिवसेना भाजपचे सरकार अस्तित्वात येणार असल्याने कुठल्याही अपेक्षेविना मी शिंदेंसोबत गेलो होतो. त्यावेळी मला पुढल्या वेळेस जेव्हा सरकार येईल त्यावेळेस नक्कीच तुम्हाला सन्मानाने मंत्रिपद देऊ, असे आश्वासन दिले होते. ज्यावेळी शिवसेनेत पक्षप्रवेश झाला त्यावेळी चर्चा झाली मात्र मंत्रिमंडळात स्थान दिले नाही. नंतर सरकार जेव्हा येईल तेव्हा पहिल्या मंत्रिमंडळात स्थान देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. जाहीर सभेत सुद्धा बोलणे झाले होते. मात्र, एवढे बोलणे झाल्यानंतर सुद्धा आता मंत्रिमंडळाच्या विस्तारात जे मागून आलेत त्यांना स्थान देण्यात आले. जे पक्षासोबत प्रामाणिक राहत नाहीत त्यांना सुद्धा मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले, असे नरेंद्र भोंडेकर म्हणाले. नरेंद्र भोंडेकर म्हणाले, शिवसेनेत उपनेतेपद हे सर्वात मोठं पद आहे. पूर्व विदर्भाचा समन्वयक म्हणून सहा जिल्ह्याची माझ्याकडे जबाबदारी आहे. मात्र, माझ्याशी कुठलेही चर्चा करण्यात आलेली नाही. त्यामुळे माझ्यावर अन्याय झाला असे वाटल्याने मी शिवसेना उपनेते आणि विदर्भा चा समन्वय पदाचा राजीनामा दिला. वेळ पडल्यास मइ आमदारकीचा देखील राजीनामा देणार. आम्हाला उधरीचा पालकमंत्री नकोय, जिल्ह्याचा पालकमंत्री हवा, ही आग्रहाची भूमिका आम्ही ठेऊन शिवसेनेत पक्षप्रवेश केला. मला देवेंद्र फडणवीस यांचा भाजपमध्ये येण्यासाठी मोठा आग्रह असल्याचे देखील भोंडेकर यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment