मनसे महाराष्ट्राच्या भूमिपुत्रांसाठी लढते, असे वाटायचे..:..ती आता गुजरातच्या भूमिपुत्रांसाठी लढते- आदित्य ठाकरे, शिंदेंसोबतच्या आमदारांवर डागली तोफ
मनसे महाराष्ट्राच्या भूमिपुत्रांसाठी लढते, असे वाटायचे, ती आता गुजरातच्या भूमिपुत्रांसाठी लढते आहे, असे दिसते, असा टोला माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे. आदित्य ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, गुजरातचे महाराष्ट्रावरील प्रेम हे सर्वांना माहिती आहे. महाराष्ट्रातील रोजगार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातला नेले. त्यांच भाजपला मनसेने लोकसभा निवडणुकीत बिनशर्त पाठिंबा दिला. त्यानंतर आता विधानसभेत मनसेने देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा दिला आहे. पैसे घेऊन बदलीस ठाकरेंचा नकार आदित्य ठाकरे म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले आमदार हे बदलीचे कामं घेऊन उद्धव ठाकरेंकडे येत होते, त्यांनी पैसे घेऊन बदलीस नकार दिला. यामुळे अनेक गैरमार्गाने पैसे मिळण्याचे साधन बंद झाले अन् ही लोकं सरकारमधून बाहेर पडले. ..म्हणून आमदार बाहेर पडले आदित्य ठाकरे म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेलेल काही आमदार बदलीचे कामे घेऊन यायचे. मात्र ठाकरेंनी पैसे घेऊन बदल्या करण्यास नकार दिला. याशिवाय अनेक गैरमार्गाने पैसे मिळवण्याचे साधन बंद केले, यातून पक्षातील आमदार पळाले. एकनाथ शिंदे-भाजपसाठी महाराष्ट्राचे दरवाजे बंद आदित्य ठाकरे म्हणाले, तुम्ही आमच्यासाठी दार-खिडक्या बंद करा, महाराष्ट्राने तुमच्यासाठी कायमचे दरवाजे बंद केले आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाहीत. गुजरातच्या हिताचे बोलणाऱ्या आणि महाराष्ट्र द्वेष्ट्या या लोकांकडे कोण जाणार? तसेच तुम्ही आमच्यासाठी दरवाजे बंद करा खिडक्या बंद करा, पण आता एकनाथ शिंदे आणि भाजपसाठी महाराष्ट्राचे दरवाजे बंद आहेत. ज्यांनी महाराष्ट्र लुटला, महाराष्ट्रातील प्रकल्प मागच्या दारातून गुजरातला नेले, अशांकडे कोण जाणार? अशी अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. मनसेवर डागले टीकास्त्र आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवरही जोरदार घणाघात केला. जो पक्ष पाच वर्ष झोपलेला असतो, तो निवडणूक आल्यावर तोडफोड, मारामारी करून सेटल होतो, सेटलमेंटकडून निवडणूक लढतो. त्यांना आम्ही महाराष्ट्रात नेमके काय काम केले हे कळणार कसे? मनसेने लोकसभेला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर ते गुजरातच्या भूमिपुत्रांच्या हक्काचे बोलत आहेत. ते महाराष्ट्राच्या भूमिपुत्राच्या हक्काचे विसरून गेले आहेत, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.