मोदींनी डझनावर देशांच्या नेत्यांशी केली चर्चा:भारताला पाकिस्तानवर लष्करी कारवाईत अडचण नाही, कारण जगाचा देशाला पाठिंबा- एनवायटी

पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर शांतता होती. पण पाच दिवसांनंतर परिस्थिती सामान्य होत आहे. २५ एप्रिल रोजी येथे फक्त ११० पर्यटक आले. २६ तारखेला ही संख्या ४०० पर्यंत वाढली. २७ एप्रिल रोजी ६०० पर्यटक आले. म्हणजेच दोन दिवसांत १००० हून अधिक पर्यटक पहलगामला पोहोचले. हल्ल्यापूर्वी येथे दररोज ७ हजारांवर पर्यटक येत असत. हल्ल्यानंतर प्रशासनाने परिसर सील केला आणि पर्यटन पूर्णपणे ठप्प झाले. आता हळूहळू पर्यटक परतू लागले आहेत. हल्ल्यानंतर ८०% बुकिंग रद्द, आता पुन्हा बुकिंग सुरू होतेय: काश्मीर हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष मुश्ताक अहमद चाया म्हणाले की, हल्ल्यानंतर काश्मीरमधील सुमारे ८०% बुकिंग रद्द करण्यात आले. हॉटेल्स रिकामी होती. पण आता परिस्थिती सामान्य होत आहे. पर्यटक पुन्हा बुकिंग करत आहेत. रविवारी काही बॉलीवूड सेलिब्रिटी पहलगाममध्ये पोहोचले. त्यांच्या आगमनामुळे स्थानिक लोक आणि पर्यटकांत आत्मविश्वास वाढला. प्रशासनानेही कडक सुरक्षा व्यवस्था केली आहे. बंगळुरूहून आलेले योगेशकुमार म्हणाले की, दहशतवादी आम्हाला घाबरवू शकत नाहीत. त्यांना दाखवून द्यायचे आहे की आमचे धैर्य त्यांच्यापेक्षा बलवान आहे. प. बंगालहून कुटुंबासह आलेले महेश बॅनर्जी म्हणाले, सुरुवातीला मला भीती वाटत होती, परंतु स्थानिकांच्या उत्साहामुळे आत्मविश्वास वाढला. ‘देशाची एकता ही मोठी शक्ती’ पंतप्रधान मोदी म्हणाले, दहशतवादाविरुद्ध या युद्धात १४० कोटी भारतीयांची एकजूटता हीच सर्वात मोठी शक्ती आहे. हीच एकता दहशतवादाच्या विरोधात आपल्या निर्णायक लढाईचा आधार आहे. या आव्हानाचा सामना करण्यासाठी आपल्या संकल्पांना मजबूत केले पाहिजे. ‘सगळे जग आपल्यासोबत’ मोदी म्हणाले, भारतात आक्रोश आहे. तोच जगभरातही आहे. मलाही जागतिक नेत्यांचे फोन आले. पत्रही मिळाले. या दहशतवादी हल्ल्याचा सर्वांनी निषेध केला. संपूर्ण जग दहशतवादाच्या विरोधातील लढाईत १४० कोटी भारतीयांच्या सोबत आहे. ‘काश्मीर उद्ध्वस्ततेचे मनसुबे’ पंतप्रधान मोदी म्हणाले, काश्मीरमध्ये शांतता नांदत होती. लोकशाही बळकट होत होती. पर्यटकांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली होती. देश व जम्मू-काश्मीरच्या शत्रूंना हे पाहवले नाही. दहशतवादी व त्यांचे म्होरके काश्मीरला उद्ध्वस्त करू इच्छितात. तिकडे बंकर्सची सफाई सुरू भारत व पाकमध्ये पहलगाम हल्ल्यानंतर तणावामुळे जम्मू-काश्मीरच्या सीमेवरील गावांमधील लोक सतर्क झाले. कोणत्याही आणीबाणीच्या स्थितीला तोंड देण्यासाठी बंकर्सची साफसफाई व गरजेच्या सामानाची व्यवस्था केली जात आहे. जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषा व आंतरराष्ट्रीय सीमेजवळ १ हजारांहून जास्त बंकर आहेत. त्यापैकी काही बंकर सीमेपासून शून्य ते तीन किमी क्षेत्रात आहेत. जाड सिमेंटच्या भिंतींनी हे बंकर बनलेले आहेत. त्यात ६ ते १० लोक आश्रय घेऊ शकतात. फेब्रुवारी २०२१ मध्ये भारत-पाकिस्तान यांच्यातील युद्धबंदी करारानंतर या बंकरचा वापर कमी झाला होता. आता पुन्हा त्याची तयारी केली जात आहे. भारतावर कारवाईचा दबाव माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेनन यांच्या म्हणण्यानुसार मोदी सरकारवर लष्करी कारवाईचा दबाव आहे. २०१६ व २०१९ मध्ये देखील भारताने दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानवर हल्ले केले होते. सरकार काश्मीरमध्ये स्थैर्य व शांतता नांदावी यासाठी प्रयत्नशील होते. परंतु त्यातच मोठा हल्ला झाल्याने सरकारची प्रतिमा मलीन होऊ शकते. परंतु परिस्थिती अनियंत्रित होण्याची शक्यता नाही. २०१९ ; चा हल्ला व यंदाच्या रणनीतीमध्ये फरक २०१९ मध्ये पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर हवाई हल्ला केला होता. त्या वेळी हल्लेखोरांचा संबंध जैश-ए-मोहंमदशी स्पष्ट होता. या वेळी हल्ल्याची जबाबदारी कोण घेत आहे, हे अस्पष्ट आहे. टीआरएफ या कमी चर्चित संघटनेने सोशल मीडियावर हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. भारतीय अधिकाऱ्यांचा विश्वास आहे की ही संघटना लष्कर-ए-तोयबाचा मुखवटा आहे. या वेळी भारत ठोस पुरावे सार्वजनिक न करता पाकिस्तानविरुद्ध कारवाईची तयारी करत आहे. राजनाथ-सीडीएस चर्चा भारत-पाक तणावादरम्यान सीडीएस जनरल अनिल चौहान यांनी नवी दिल्लीत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. बैठक ४० मिनिटे चालली. सद्य:स्थितीवर चर्चा झाली. दुसरीकडे विरोधी पक्षांनी पहलगाम हल्ल्यावरील चर्चेसाठी विशेष सत्र बोलावण्याचे आवाहन केले आहे. पहलगाम : पर्यटन पुन्हा रुळावर येऊ लागले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या १२१ व्या भागात पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. याप्रसंगी ते म्हणाले, पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी घटनेने देशातील प्रत्येक नागरिकाला दु:ख झाले. पीडित कुटुंबाविषयी प्रत्येक भारतीयाच्या मनात संवेदना आहेत. मग भले तो कोणत्याही राज्याचा, कोणतीही भाषा बोलणारा असो. या हल्ल्यात आपल्या कुटुंबीयांना गमावलेल्यांच्या वेदना प्रत्येक नागरिक अनुभवत आहे. मला जाणीव आहे – प्रत्येक भारतीयाचे रक्त दहशतवादी हल्ल्याच्या या छायाचित्रांना पाहून उसळत आहे. पहलगाममधील हल्ला दहशतवादाला पोसणाऱ्यांची हतबलता दाखवतो. त्यांचा भ्याडपणा दिसतो. पीडित कुटुंबांना मी ग्वाही देतो. न्याय होणारच. हल्ल्यातील दोषी, कट करणाऱ्यांना कठोर उत्तर दिले जाईल.’ भारताने पहलगामच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या विरोधात कारवाईला आधार तयार करण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकन वृत्तपत्र न्यूयॉर्क टाइम्सच्या (एनवायटी) वृत्तानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आतापर्यंत डझनाहून जास्त नेत्यांशी फोनवरून चर्चा केली आहे. दिल्लीत १०० हून जास्त परराष्ट्र मिशनच्या मुत्सुद्द्यांना विदेश मंत्रालयात माहिती दिली . मात्र हे प्रयत्न तणाव कमी करण्यासाठी नव्हे तर पाकिस्तानच्या विरोधात संभाव्य लष्करी कारवायांसाठी पाठिंबा मिळवण्याच्या दिशेने दिसत आहेत. मोदींनी पाकिस्तानचा नामोल्लेख न करता गुरुवारनंतर रविवारीही दहशतवाद्यांचे अड्डे नेस्तनाबूत केले जातील व दोषींना कठोर शिक्षा केली जाईल, याचा पुनरुच्चार केला. त्या दरम्यान, सीमेवर दोन्ही देशांत अधूनमधून गोळीबार होत होता. काश्मीरमध्ये भारतीय सुरक्षा दलांनी कडक मोहीम राबवत शेकडो संशयितांना अटक केली आहे. भारताने सिंधू जल करार रोखणे आणि पाकिस्तानी मुत्सद्दी व नागरिकांना देश सोडण्याचा आदेश दिला आहे. पाकिस्ताननेदेखील द्विपक्षीय करारातून माघार घेण्याची धमकी दिली आहे. अशा स्थितीत भारतावर जागतिक दबाव खूप कमी आहे. यामुळे आपली रणनीती पुढे नेण्यासाठी भारताला मोठा वाव आहे.