मोदींनी संविधान वाचलेच नाही:वाचले असते तर अनादर केला नसता, राहुल गांधी यांचा घणाघात
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची गोंदिया येथे प्रचारसभा पार पडत आहे. मी जेव्हा महाराष्ट्रात येतो, तुमच्या चेहऱ्यांवर काँग्रेसची विचारधारा दिसून येते. यावेळी राहुल गांधी यांनी संविधानाची प्रत दाखवत म्हणाले, मोदीजी म्हणतात राहुल गांधी लाल रंगाचे संविधान दाखवत आहेत. मला सांगा या संविधानात फुले, शाहू, आंबेडकर यांचे विचार आहेत की नाही? हे हजारो वर्षांपूर्वीचे विचार आहेत. संविधानात शिवाजी महाराजांचे विचार आहेत. मारहाण करावी, गरिबांना दाबले जावे, असे या संविधानात लिहिले आहे का? मला दाखवा. पंतप्रधान नरेंद्र मोदींना संविधान वाचलेच नाही. कारण त्यांनी वाचले असते, तर त्याचा अनादर केला नसता, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे. संविधानात शिवाजी महाराजांचे विचार या संविधानात महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध, नारायण गुरू, बसव आण्णा या सर्वांचे विचार आहेत. हे हजारो वर्षे जुने पुस्तक आहे. यामध्ये हजारो वर्ष जुने विचार आहेत. शिवाजी महाराज संविधानाविरोधात कधी बोलले होते का? शिवाजी महाराजांचे विचार या संविधानात आहेत. संतांचे विचार आहेत. एकता, प्रेम, समानता, प्रत्येक धर्माचा आदर संविधानात आहे. आपण एकमेकांचे जीव घेतले पाहिजे, शिवीगाळ केली पाहिजे, गरीबांचे खच्चीकरण करावे, शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव देऊ नये, असे संविधानात कुठे लिहिले आहे का? लिहिले असेल, तर मला दाखवा, असे राहुल गांधी म्हणाले. मी गॅरंटीने सांगतो की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधान वाचलेच नाही. कारण त्यांनी संविधान वाचले असते, तर त्यात जे लिहिले आहे, त्याचा आदर केला असता. नरेंद्र मोदी आणि आरएसएसचे लोक 24 तास संविधानावर आक्रमण करत आहेत, अशी टीका राहुल गांधी यांनी केली. बातमी अपडेट करत आहोत….