मोफत अंत्यसंस्कारांसाठी पाच लाख गोवऱ्या दान:कोल्हापूर शहरात १९७८ मध्ये उपक्रम सुरू

जन्म कुठेही होवो, पण मृत्यू मात्र कोल्हापुरात यावा असे म्हणतात…कारण इथे मृतांवर मोफत अंत्यसंस्कार केले जातात. कोल्हापूर महानगरपालिकेच्या सर्वच स्मशानांत ही सेवा दिली जाते. यासाठी वर्षभर गोवऱ्या दान करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. होळी सणाच्या निमित्ताने महानगरपालिकेच्या वतीने “होळी लहान करा गोवऱ्या दान करा,’ असे आवाहन करून दान उपक्रम राबवला जातो. प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षीही या उपक्रमाला प्रतिसाद लाभला असून कोल्हापूरकरांच्या दातृत्वातून तब्बल ५ लाख गोवऱ्या जमा झाल्या आहेत. मनपा स्थापनेपासून कोल्हापूर शहरातील मुख्य चार स्मशानभूमीत मोफत अंत्यसंस्कार केले जातात. तत्कालीन स्थायी समिती सभापती सुभाष वोरा यांच्या पुढाकाराने १९७८ मध्ये मोफत अंत्यसंस्कार करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला. समाजातून त्याचे स्वागत झाले. पंचगंगा स्मशानभूमीसह कालांतराने कदमवाडी, बापट कॅम्प व कसबा बावडा येथे स्मशानभूमी बांधण्यात आल्या. या ठिकाणीही मोफत अंत्यसंस्कार सुरू करण्यात आले. अंत्यसंस्काराच्या संपूर्ण खर्चाचा बोजा कोल्हापूर महानगरपालिकेवर पडत होता, पण गेल्या नऊ वर्षांपासून महापालिका होळी सणाच्या निमित्ताने “होळी लहान करा आणि शेणी दान करा….’ उपक्रम राबवत आहे. प्रतिवर्षी या उपक्रमाला प्रतिसाद मिळत असून अगदी पाच शेणाच्या गोवऱ्यांपासून हजार, दोन हजार, दहा हजार अशा लाखोंच्या आकड्यात गोवऱ्या जमा होतात. तसेच स्मशानभूमीत कोल्हापूर महानगरपालिकेने दानपेट्या बसवल्या आहेत. यातून जवळपास चार लाखांच्या आसपास रक्कम जमा होते. पण, मोफत अंत्यसंस्कार उपक्रमाला येणाऱ्या खर्चाच्या तुलनेत ही मदत फार कमी असली तरी वर्षागणिक मदतीत वाढ होत आहे. दरवर्षी ५० लाख खर्च