‘एमपीएल’मध्ये बीडच्या पाच खेळाडूंची निवड:जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या शिरपेचात मानाचा तुरा, 4 जूनपासून पुण्यात रंगणार थरार

‘एमपीएल’मध्ये बीडच्या पाच खेळाडूंची निवड:जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या शिरपेचात मानाचा तुरा, 4 जूनपासून पुण्यात रंगणार थरार

बीड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या पाच खेळाडूंनी महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल) स्पर्धेसाठी निवड सुनिश्चित केली आहे. यामध्ये सचिन धस (कोल्हापूर टस्कर्स), ऋषिकेश सोनवणे (पुणेरी बाप्पा), सौरभ नवले आणि देव नवले (सातारा वॉरियर्स), तसेच समर्थ कदम (रत्नागिरी जेट्स) या खेळाडूंचा सहभाग आहे. ही निवड केवळ खेळाडूंच्या मेहनतीचे फलित नसून बीड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या पारदर्शक आणि गुणवत्तेला प्राधान्य देणाऱ्या निवड प्रक्रियेचेही प्रत्यक्ष फलित आहे. अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्रे, ब्रँडेड सुविधा आणि मोठ्या आर्थिक पाठबळाचा अभाव असूनही बीडचे खेळाडू राज्यस्तरावर चमकत आहेत, ही बाब निश्चितच जिल्ह्यासाठी गौरवाची आहे. या यशाबद्दल खेळाडूंना बीड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर, कार्याध्यक्ष डॉ.योगेश क्षीरसागर, सचिव आमेर सलीम, तसेच महेश वाघमारे, राजन साळवी, इरफान कुरेशी, मनोज जोगदंड, जावेद पाशा, रिजवान खान, शेख आरेफ, अतीक कुरेशी, सुनील गोपी शेट्टी, गोपाल गुरखूदे, सरफराज मोमीन, अक्षय नरवडे, पठाण शाहरुख आदींनी अभिनंदन केले आहे. दरम्यान, येत्या 4 जून पासून पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर महाराष्ट्र प्रीमियर लीग व वुमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग या स्पर्धांचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेतील एमपीएलचा 4एस पुणेरी बाप्पा हा संघ तर डब्लूएमपीएलचा पुणे वॉरियर्सचा संघ सज्ज झाला आहे, अशी माहिती महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. रोहित पवार म्हणाले की महाराष्ट्र प्रीमियर लीगमुळे महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातील सर्वसामान्य कुटुंबातील अनेक नवोदित खेळाडूंना योग्य वेळी संधी मिळत आहे. या स्पर्धेमुळे त्यांच्यासाठी भविष्यातील अनेक दरवाजे उघडले आहेत. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे (एमसीए) राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला क्रिकेटच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी प्रत्येकी 75 लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. जिल्हास्तरावर पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी, अनेक नवीन प्रतिभावान खेळाडू निर्माण करण्यासाठी एमसीए सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात क्रिकेट सुविधांचा विकास करून महाराष्ट्र क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी एमसीए सदैव कटिबद्ध आहे. हेही वाचा

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment