ज्याच्या हातामध्ये ईव्हीएम त्याची लोकशाही:संजय राऊतांचा आरोप; कोणत्याही स्थितीत मुंबई मनपावर विजय मिळवण्याचा निर्धार

ज्याच्या हातामध्ये ईव्हीएम त्याची लोकशाही:संजय राऊतांचा आरोप; कोणत्याही स्थितीत मुंबई मनपावर विजय मिळवण्याचा निर्धार

गेली सत्तर वर्षात अशा प्रकारच्या निवडणुका आम्ही पाहिल्या नसल्याचे उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. ज्यांनी आम्हाला मतदान केले, त्यांचे मतदान आमच्यापर्यंत पोहोचले नाही, अशी लोकांची भावना आहे. लोकांच्या या संतप्त भावना आहेत. त्याचा आम्ही आदर करून स्वीकार करत असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. आता जे आमच्या सोबत आहेत, त्यांना घेऊन आम्ही पुढे जाणार असल्याचे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे. आपल्या देशामध्ये ज्याच्या हातामध्ये ईव्हीएम त्याची लोकशाही, असे समीकरण झाले आहे. मात्र आता आम्ही पुढे जाणार असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. सरकार स्थापन झाले मात्र, मंत्रिमंडळ तयार होत नव्हते. मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला मात्र अद्याप खाते वाटप जाहीर होत नाही. पाशवी बहुमत तुमच्याकडे आहे, अशावेळी तुम्हाला कोण अडवते? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला. भारतीय जनता पक्ष एकट्याकडे 140 च्या जवळपास जागा आहेत. तरीही तुम्हाला खाते वाटप करता येत नाही, त्यामुळे राज्य कसे चालेल? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला. राज्यात खून, दरोडे होत आहेत. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी 14 कोटी जनतेचे आभार मानले. मात्र त्यांना 14 कोटी जनतेने निवडलेले नसल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. आगामी महापालिका निवडणुकीसंदर्भात आढावा घेण्यासाठी संजय राऊत पुणे दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मनपा निवडणुकी संदर्भात कार्यकर्त्यांशी आमच्या बैठका होणार असल्याचे त्यांनी सांगितले. महाविकास आघाडी अजूनही आहे. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्वबळावर व्हाव्यात, अशी कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले. तर… जुन्नर विधानसभा आम्ही शंभर टक्के जिंकलो असतो तिन्ही पक्षांनी एकत्र येऊनच महाविकास आघाडीच्या माध्यमातून लोकसभा निवडणूक लढली होती. विधानसभा निवडणुकीत देखील आम्हाला विजयाचे खात्री होती. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान आम्हाला काही जागा मिळायला हव्या होत्या. त्या आम्हाला मिळाल्या नाहीत. अशीच अपेक्षा राष्ट्रवादी आणि काँग्रेसची देखील असेल. जुन्नर विधानसभा मतदारसंघाची जागा जर आम्ही लढलो असतो तर आम्ही शंभर टक्के जिंकलो असतो, अशी देखील कार्यकर्त्यांची भावना आहे. असेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देखील वाटत असेल, असेही ते म्हणाले.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment