मुंबईनंतर अहमदाबाद, सुरतवारी; ऑक्टोबरला नाइट लँडिंगची सोय:16 एप्रिलपासून अमरावतीहून मुंबईसाठी विमानसेवा- स्वाती पांडे‎

मुंबईनंतर अहमदाबाद, सुरतवारी; ऑक्टोबरला नाइट लँडिंगची सोय:16 एप्रिलपासून अमरावतीहून मुंबईसाठी विमानसेवा- स्वाती पांडे‎

केंद्र सरकारच्या उड्डाण योजनेअंतर्गत अमरावती विमानतळावरून १६ एप्रिलपासून मुंबईसाठी विमानसेवा सुरू होत आहे. आठवड्यातून तीन दिवस ही सेवा दिली जाणार आहे. अमरावती ते मुंबई विमान सेवेनंतर अमरावतीमधील कापड बाजार लक्षात घेता या ठिकाणावरून सुरत व अहमदाबाद येथे विमानसेवा सुरू करण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनीच्या उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे यांनी शनिवारी (दि. १२) विमानतळावर आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले आहे. अमरावती (बेलोरा) येथे ३३ वर्षांपूर्वी विमानतळ मंजूर झाले आहे. त्यानंतर हळूहळू ते तयार झाले मात्र अपवादात्मक स्थिती वगळता आतापर्यंत हे विमानतळ केवळ ‘व्हीआयपीं’च्या विमान उड्डाणापुरते मर्यादित होते. परंतु १६ एप्रिलला पहिल्यांदा प्रवासी विमानसेवा या ठिकाणाहून सुरू होत आहे. अमरावती विमानतळावर प्रवासी विमान सेवेसाठी आवश्यक {उर्वरित. पान ४ सध्या ठरवलेल्या विमान वेळा सोईच्या नाहीत. कारण सायंकाळी ४.४० वाजता अमरावतीहून मुंबईत गेलेल्या व्यक्तीला कोणतेही शासकीय काम करून त्याच दिवशी परत येणे शक्य होणार नाही. त्याला मुंबईत मुक्कामाचा अतिरिक्त खर्च करावा लागेल. त्यामुळे ही वेळ सकाळच्या सत्रात असावी, अशी नागरिकांची मागणी आहे. त्यावर स्वाती पांडे म्हणाल्या, की मुंबई विमानतळावर प्रचंड ट्रॅफिक आहे, त्यामुळे ‘टाईम स्लॉट’ उपलब्धतेत अडचणी येत आहेत. मात्र ही वेळ बदलण्यासाठी ‘अलायन्स एअर’सोबत चर्चा करू. कलेक्टर कटियार म्हणाले, आगामी काळात नवी मुंबईचे विमानतळ सुरू झाल्यानंतर वेळेत बदल करता येईल काय, याबाबत अलायन्स एअरच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे. सोमवार, बुधवारी आणि शुक्रवार असे आठवड्यातून तीन दिवस विमानसेवा अमरावतीकरांना मिळणार आहे. दुपारी २ वाजून ३० मिनिटांनी मुंबईतून निघालेले विमान अमरावती विमानतळावर ४ वाजून १५ मिनिटांनी लँड करेल. त्यानंतर तेच विमान अवघ्या २५ मिनिटांत म्हणजेच ४ वाजून ४० मिनिटांनी अमरावतीहून मुंबईसाठी उड्डाण घेईल आणि ६ वाजून २५ मिनिटांनी मुंबईत पोहोचणार आहे. दु. अडीचला मुंबईहून तर ४.४५ ला बेलोराहून उड्डाण विमानाची वेळ बदलासाठी प्रयत्न

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment