बहुमतासोबत आमची जबाबदारी देखील वाढली:2-3 वर्षांत वीजेचे दर कमी करू शकतो, मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास

बहुमतासोबत आमची जबाबदारी देखील वाढली:2-3 वर्षांत वीजेचे दर कमी करू शकतो, मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास

विधानसभा निवडणुकीत पत्रकारांचे सहकार्य मोठ्या प्रमाणात लाभले. लोकसभा निवडणुकीवेळी महाराष्ट्रात फेक नरेटीव्ह तयार करण्यात आला होता. त्या फेक नरेटीव्हचा मोठा फटका आम्हाला बसला. विधानसभा निवडणुकीत तो फेक नरेटीव्ह तोडू शकलो आणि थेट जनतेपर्यंत पोहचू शकलो. त्यामुळे महाराष्ट्राच्या आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वांत मोठा विजय 237 जागा महायुतीला प्राप्त झाल्या. भाजपला राजकीय जीवनातील उच्चांक 132 जागा मिळाल्या. एवढे मोठे बहुमत मिळाल्यामुळे आमची जबाबदारी देखील वाढली आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. कोणतेही बहुमत जनतेच्या अपेक्षा घेऊन येत असते. आव्हाने, अपेक्षा, अडचणी आणि मर्यादा असतात. परंतु या अडचणी आणि मर्यादांवर मात करून जनतेच्या मनातील कामे झाली पाहिजे. तशा प्रकारचा महाराष्ट्र तयार झाला पाहिजे, हा प्रयत्न करायचा आहे. 2014 साली मुख्यमंत्री झाल्यानंतर अनेक लोकांच्या मनात अनेक शंका होत्या. काही लोकांना वाटायचे की, हा मंत्री पण राहिलेला नाही. मुख्यमंत्री म्हणून कसा काम करेल, काही लोकांना वाटायचे नवख्या व्यक्तीकडे काम आलेले आहे. परंतु माझ्या पहिल्या पाच वर्षांच्या कामात विदर्भाचा हक्क मिळवून देण्याचा प्रयत्न केला. सोबतच महाराष्ट्रातील कोणत्याच भागावर अन्याय होऊ दिला नाही, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. 2-3 वर्षांत वीजेचे दर कमी करू शकतो विदर्भामध्ये सिंचनाचे प्रकल्प मोठ्या प्रमाणात केले. 80 प्रकल्प पूर्ण केले असून अनेक प्रकल्प पूर्णत्वापर्यंत आणले. त्याचबरोबर वर्षानुवर्ष रखडलेले पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यासह कोकणातील प्रकल्प पूर्ण केले. सर्वच क्षेत्रात मोठी भरारी त्या पाच वर्षांत घेतली. त्यानंतर गेल्या अडीच वर्षांत उपमुख्यमंत्री पदाची संधी भेटल्यानंतर ऊर्जा, सिंचन, गृहनिर्माण, गृहमंत्री अशा अनेक खात्यांचे काम केले. ऊर्जा विभागाचा पुढील 25 वर्षांचा रोड मॅप आपण तयार केला आहे. पुढील 2-3 वर्षात सर्वच प्रकारचे वीजेचे दर आपण कमी करू शकतो, अशा प्रकारची व्यवस्था ऊर्जा विभागात उभी केली असल्याचे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. ही बातमी अपडेट करत आहोत…

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment