नागालँडच्या तरुणाला बाणेर टेकडीवर लूटले:धारदार शस्त्राचा धाक दाखवत मैत्रिणीला बेदम मारहाण

नागालँडच्या तरुणाला बाणेर टेकडीवर लूटले:धारदार शस्त्राचा धाक दाखवत मैत्रिणीला बेदम मारहाण

पुणे शहरातील कोंढवा परिसरात बोपदेव घाटात तरुणीवर तीन जणांनी सामूहिक बलात्कार करुन धारदार कोयत्याच्या धाकाने लूटमार करण्यात आल्याची घटना नुकतीच घडलेली असतानाच, आता बाणेर टेकडीवर फिरायला आलेल्या तरुण आणि त्याच्या मैत्रिणीला बेदम मारहाण करुन त्यांच्याकडील मोबाइल, अन्य वस्तू असा 51 हजार रुपयांचा मुद्देमाल लुटून नेण्यात आल्याची घटना घडली. दहा दिवसांपूर्वी बाणेर टेकडीवर अशाचप्रकारे ईशान्य भारतातील एका विद्यार्थ्याला मारहाण करुन लुटण्यात आल्याची घटना घडलेली होती. याबाबत अबिनियू चवांग (वय 36, रा. रोहन नील अपार्टमेंट, ओैंध, मु.रा.नागालँड) यांनी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. अबिनियू आणि त्यांची मैत्रीण चिंगमलाई पामेई रविवारी सायंकाळी बाणेर टेकडीवर फिरावयला गेले होते. त्यावेळी 18 ते 20 वयोगटातील चार जणांनी त्यांना अडवले. त्यांना धारदार शस्त्राचा धाक दाखविला. दोघांना मारहाण केली, तसेच अबिनियूची मैत्रीण चिंगमलाईच्या करंगळीवर शस्त्राने वार केला. त्यांच्याकडील मोबाइल, इअर बड, तसेच अन्य साहित्य असा मुद्देमाल लुटून चोरटे पसार झाले. घाबरलेले अबिनियू आणि त्यांची मैत्रीण चतु:शृंगी पोलिस ठाण्यात गेले. रात्री उशीरा याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलिस आयुक्त अनुजा देशमाने, वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बोळकोटगी यांनी घटनास्थळी भेट दिली. उपनिरीक्षक प्रवीण चौगले तपास करत आहेत. बोपदेव घाटात कोयत्याच्या धाकाने महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना 3 ऑक्टोबर रोजी घडली होती. त्यापूर्वी बाणेर टेकडी परिसरात इशान्य भारतातून शिक्षाणासाठी आलेला विद्यार्थी आणि त्याच्या बरोबर असलेल्या मित्राला मारहाण करून लुटण्यात आल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी अल्पवयीनांसह साथीदारांना अटक केली होती. बोपदेव घाट प्रकरणानंतर शहरातील टेकड्या, निर्जन भागात प्रखर प्रकाशझोत बसविण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात पार पडलेल्या कार्यक्रमात सांगितले होते. टेकड्यांच्या परिसरात पोलिसांनी गस्त घालावी, असे आदेश पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले होते.

​पुणे शहरातील कोंढवा परिसरात बोपदेव घाटात तरुणीवर तीन जणांनी सामूहिक बलात्कार करुन धारदार कोयत्याच्या धाकाने लूटमार करण्यात आल्याची घटना नुकतीच घडलेली असतानाच, आता बाणेर टेकडीवर फिरायला आलेल्या तरुण आणि त्याच्या मैत्रिणीला बेदम मारहाण करुन त्यांच्याकडील मोबाइल, अन्य वस्तू असा 51 हजार रुपयांचा मुद्देमाल लुटून नेण्यात आल्याची घटना घडली. दहा दिवसांपूर्वी बाणेर टेकडीवर अशाचप्रकारे ईशान्य भारतातील एका विद्यार्थ्याला मारहाण करुन लुटण्यात आल्याची घटना घडलेली होती. याबाबत अबिनियू चवांग (वय 36, रा. रोहन नील अपार्टमेंट, ओैंध, मु.रा.नागालँड) यांनी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. अबिनियू आणि त्यांची मैत्रीण चिंगमलाई पामेई रविवारी सायंकाळी बाणेर टेकडीवर फिरावयला गेले होते. त्यावेळी 18 ते 20 वयोगटातील चार जणांनी त्यांना अडवले. त्यांना धारदार शस्त्राचा धाक दाखविला. दोघांना मारहाण केली, तसेच अबिनियूची मैत्रीण चिंगमलाईच्या करंगळीवर शस्त्राने वार केला. त्यांच्याकडील मोबाइल, इअर बड, तसेच अन्य साहित्य असा मुद्देमाल लुटून चोरटे पसार झाले. घाबरलेले अबिनियू आणि त्यांची मैत्रीण चतु:शृंगी पोलिस ठाण्यात गेले. रात्री उशीरा याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलिस आयुक्त अनुजा देशमाने, वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बोळकोटगी यांनी घटनास्थळी भेट दिली. उपनिरीक्षक प्रवीण चौगले तपास करत आहेत. बोपदेव घाटात कोयत्याच्या धाकाने महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना 3 ऑक्टोबर रोजी घडली होती. त्यापूर्वी बाणेर टेकडी परिसरात इशान्य भारतातून शिक्षाणासाठी आलेला विद्यार्थी आणि त्याच्या बरोबर असलेल्या मित्राला मारहाण करून लुटण्यात आल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी अल्पवयीनांसह साथीदारांना अटक केली होती. बोपदेव घाट प्रकरणानंतर शहरातील टेकड्या, निर्जन भागात प्रखर प्रकाशझोत बसविण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात पार पडलेल्या कार्यक्रमात सांगितले होते. टेकड्यांच्या परिसरात पोलिसांनी गस्त घालावी, असे आदेश पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले होते.  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment