नागपुरात मंत्रिमंडळाचा विस्तार:महाराष्ट्र भाजप अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली
विधानसभा निवडणूक निकालानंतर बहुप्रतीक्षित असलेला फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार नागपुरात होत आहे. यासाठी राजभवनात जय्यत तयारी करण्यात आली आहे. महाराष्ट्रात तब्बल 33 वर्षांनंतर राज्याच्या उपराजधानीत मंत्रिमंडळ विस्तार आणि शपथविधी होणार आहे. यापूर्वी 21 डिसेंबर 1991 रोजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रिमंडळाचा नागपुरात विस्तार झाला होता. आज मंत्रिमंडळ विस्तारात 30-32 मंत्री शपथ घेऊ शकतात. त्यापैकी 20-21 भाजपचे आमदार मंत्री होऊ शकतात. शिवसेनेला 11-12 आणि राष्ट्रवादी-अजित गटाला 9-10 मंत्रीपदे मिळू शकतात. आज शपथ घेणाऱ्या मंत्र्यांचा कार्यकाळ अडीच वर्षांचा असेल, असे राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी शपथविधीपूर्वीच सांगितले आहे. महायुतीच्या सर्व आमदारांना हा नियम लागू होणार आहे. त्यानंतर नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे.