नागपूर IIM मध्ये सौरऊर्जा प्रकल्पाचे भूमिपूजन:2 मेगावॉट क्षमतेचा प्रकल्प; CM फडणवीस यांच्या हस्ते गोल्फ अकॅडमीच्या कोनशिलेचे अनावरण

नागपूर IIM मध्ये सौरऊर्जा प्रकल्पाचे भूमिपूजन:2 मेगावॉट क्षमतेचा प्रकल्प; CM फडणवीस यांच्या हस्ते गोल्फ अकॅडमीच्या कोनशिलेचे अनावरण

नागपूर आयआयएमच्या कॅम्पसमध्ये रविवारी दोन मेगावॉट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रकल्पामुळे आयआयएम नागपूर ‘नेट झिरो कॅम्पस’ बनणार आहे. कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी २०३० पर्यंत राज्यातील एकूण ऊर्जा निर्मितीपैकी ५२ टक्के ऊर्जा अपारंपरिक स्त्रोतांपासून निर्माण करण्याचे उद्दिष्ट मांडले. यावेळी त्यांनी आयआयएम परिसरातील गोल्फ अकॅडमीच्या कोनशिलेचेही अनावरण केले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुण्यात लवकरच सुरू होणाऱ्या आयआयएमचा उल्लेख केला. त्यांनी नमूद केले की, पूर्वी प्रथम पुण्यात प्रकल्प सुरू व्हायचे आणि नंतर नागपूरमध्ये येत. मात्र आता हा क्रम बदलला असून, आधी नागपूर आणि मग पुण्याचा क्रमांक लागत असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. २०१४ ते २०१९ या काळात फडणवीस मुख्यमंत्री असताना नागपूरमध्ये मेट्रो, आयआयएम, एम्स, ट्रिपल आयटी आणि राष्ट्रीय विधी विद्यापीठासारख्या राष्ट्रीय स्तरावरील संस्था सुरू झाल्या. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरल्यानंतर ते पुन्हा मुख्यमंत्री झाले आहेत.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment