नागपूर मध्ये झालेली दंगल ही देवेंद्र फडणवीस पुरस्कृत:मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा आरोप; म्हणाले- मुसलमान लोकांना कबीवर प्रेम असणे गरजेचे नाही

नागपूर मध्ये झालेली दंगल ही देवेंद्र फडणवीस पुरस्कृत:मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा आरोप; म्हणाले- मुसलमान लोकांना कबीवर प्रेम असणे गरजेचे नाही

नागपूर मध्ये झालेली दंगल ही देवेंद्र फडणवीस पुरस्कृत असल्याचा आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. इथल्या मुसलमान लोकांना कबीवर प्रेम असणे गरजेचे नाही. ही दंगल सरकार आणि फडणवीस पुरस्कृत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांना सोलापूरकर दिसत नाही का? तिथे हिंदुत्व जागत नाही का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. नागपूर मध्ये झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील माध्यमांशी बोलत होते. वेरूळमध्ये मालोजी राजे भोसले यांची गढी आहे. शहाजीराजे भोसले यांच्या जयंती निमित्ताने या गढी येथे मानवंदना अर्पण करण्याचा कार्यक्रमा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजातील इतर नेते उपस्थित होते. या वेळी मनोज जरांगे पाटील यांनी नागपूर येथे घडलेल्या हिंसाचाराच्या घटनेवर हे भाष्य केले आहे. निवडणुका आल्या की, वाद उकरुन काढला जातो. त्यामुळे समाजाने सावध राहणे गरजेचे असल्याचे देखील आवाहन त्यांनी केले आहे. सरकारला ही कबर काढायची असेल तर काढू शकता निवडणुका डोळ्यासमोर ठेवून असले वाद काढले जात आहे. मात्र रक्षण करणे ही तुमची जबाबदारी असल्याचा जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. कबरीचे रक्षण तुम्हीच करता ना? मग ते मूर्ख? तुम्हीही मूर्ख का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सरकारचेच लोक कबर हटावण्याची मागणी करतात. त्यामुळे गोरगरिबांना अडचणीत आणले जात असल्याचे ते म्हणाले. मुस्लिम समाजाने देखील या कबरीवर प्रेम करू नका, असा आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. सरकारला ही कबर काढायची असेल तर काढू शकता. मात्र गोरगरिबांना झुंजवू नका, असे देखील ते म्हणाले. तेलंगणा राज्याने 42 टक्के ओबीसी आरक्षण दिले. मात्र महाराष्ट्र हे करणार नाही. फडणवीस असे करणार नाहीत. त्यामुळे लोकांनी शांत राहावे आणि पोटापाण्याचे काम करावे, त्यांनी दंगली करू नये, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment