नागपूर हिंसाचारातील PHOTOs अन् VIDEOs:2 जेसीबी जाळले, अनेक वाहनांची तोडफोड; दगडफेकीत पोलिसही जखमी

नागपुरात महाल येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाच्या कबरीविरोधात आंदोलन केले. या दरम्यान औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर जाळण्यात आली. यासोबत एक पुस्तक जाळल्याची अफवा पसरल्याने एका जमावाने आक्रमक होत दगडफेक करत वाहनांची तोडफोड सुरू केली. महाल गांधीगेट शिवाजी पुतळा ते चिटणीस पार्क चौका दरम्यान दंगल सुरू झाली. दोन्ही बाजूने कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याने पोलिसांनी अश्रृधुराच्या नळकांड्यांचा मारा सुरू केला. तर जमावाला पांगवण्यासाठी लाठीमार सुरू केला. जमावाकडून केलेल्या दगडफेकीमध्ये पोलिस कर्मचारी जखमी झाले. खाली पाहा या घटनेतील काही फोटोज… खालील व्हिडिओत पाहा…जमाव वाहनांची तोडफोड करताना