नरेंद्र चपळगावकर; कृतिशील विचारवंत हरवला:पत्रकारिता, अध्यापन, लेखन, वकिली, न्यायदानासारख्या क्षेत्रात भरीव काम; वाचा संपूर्ण जीवनप्रवास
![नरेंद्र चपळगावकर; कृतिशील विचारवंत हरवला:पत्रकारिता, अध्यापन, लेखन, वकिली, न्यायदानासारख्या क्षेत्रात भरीव काम; वाचा संपूर्ण जीवनप्रवास](https://images.bhaskarassets.com/thumb/1000x1000/web2images/5483/2025/01/25/ezgifcom-animated-gif-maker-6_1737780496.gif)
न्या. नरेंद्र चपळगावकर यांचे मूळ गाव सोलापूर जिल्ह्यातील चपळगाव होते. मात्र, त्यांचे कुटुंबातील अनेक पिढ्या बीड जिल्ह्यात स्थायिक होत्या. त्यामुळे चपळगावकर हे मूळचे बीडचे असल्याचे मानले जाते. न्या. नरेंद्र चपळगावकर यांचा जन्म 14 जुलै 1938 रोजी बीड जिल्ह्यातच झाला होता. त्यांचे चुलत आजोबा आणि वडील हैदराबाद संस्थानामध्ये वकिली करत असत. भारतीय स्वातंत्र्यानंतर हैदराबाद संस्थान देखील भारतात सामील झाले. त्यानंतरही त्यांच्या वडिलांनी बीड येथे वकिली सुरू ठेवली होती. त्यांच्या कुटुंबातील काही व्यक्ती या संस्थानच्या सरकारी नोकरीत देखील होते. त्यामुळे सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याचे संस्कार त्यांच्यावर घरातूनच झाले होते. न्या. नरेंद्र चपळगावकर यांचे वडील पुरुषोत्तम चपळगावकर हे काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष होते. पुरुषोत्तम चपळगावकर यांनी स्वातंत्र्यलढ्यात देखील सहभाग घेतला होता. त्यामुळे त्यांना अनेकवेळा कारावासही भोगावा लागला. परंतु त्यांच्या या राजकीय आणि स्वातंत्र्य चळवळीतील सहभागामुळे चपळगावकर कुटुंबाचा अनेक नेत्यांशी संबंध आला. या नेत्यांमध्ये अनंत भालेराव, स्वामी रामानंद तीर्थ यांच्यासारख्या नेत्यांचा समावेश आहे. राष्ट्र सेवा दलाचे संस्कार आणि अशा महान नेत्यांचा जवळचा सहवास लाभल्याने त्याचे संस्कार देखील नरेंद्र यांच्यावर झाले. न्या. चपळगावकर यांचा जीवनप्रवास नरेंद्र चपळगावकर यांनी लिहिलेली पुस्तके चपळगावकर यांना मिळालेले पुरस्कार