नरेंद्र मोदी हे 2029 मध्ये पुन्हा पंतप्रधान होतील:देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास; MMRDA साठी 4 लाख 7 हजार कोटींचे फंडिंग

नरेंद्र मोदी हे 2029 मध्ये पुन्हा पंतप्रधान होतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. आयजीएफ मुंबई NXT -25 या इंडिया ग्लोबल फोरमने आयोजित केलेल्या प्रमुख वार्षिक शिखर परिषदेत ते बोलत होते. मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे ही परिषद होत असून या परिषदेत पुढील 25 वर्षांमध्ये गुंतवणूक, तंत्रज्ञान, शाश्वतता आणि नवोपक्रम यावर लक्ष केंद्रित करून जागतिक परिवर्तनात भारताची भूमिका स्पष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी देखील संवाद साधला. मुंबईतील एमएमआरडीए अंतर्गत राज्य सरकारच्या वतीने हातात घेण्यात आलेल्या प्रकल्पांच्या फंडांसाठी आज करार झाले असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. यात 4 लाख 7 हजार कोटी रुपयांचे फंडिंग या वेगवेगळ्या प्रकल्पासाठी आज उपलब्ध झाले असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे आता या अंतर्गत होणाऱ्या प्रोजेक्टला कोणताही निधी कमी पडणार नसल्याचा दावा फडणवीस यांनी केला आहे. यामध्ये रस्ते, मेट्रो, टनेल अशा प्रकल्पाचा समावेश आहे. यातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार असल्याचा दावा देखील त्यांनी केला. आम्ही हे वृत्त अपडेट करत आहोत.