नाथवाड्यातील रांजण भरण्यास प्रारंभ; भक्त तीन दिवस दररोज टाकणार पाणी:पैठण येथे नाथषष्ठीला औपचारिकरीत्या सुरुवात; गुरुवारी मानाची दिंडी

संत एकनाथ महाराज यांच्यानाथषष्ठी उत्सवाला रविवारी (दि.१६) औपचारिकरीत्या सुरुवातझाली. संत तुकाराम महाराजबीजनिमित्त नाथवंशजांच्याउपस्थितीत एकनाथ महाराजयांच्या वाड्यातील पवित्र रांजणभरण्यास सुरुवात झाली असून,महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थितराहून रांजणाचे दर्शन घेतले. तीनदिवस रोज रांजणात पाणीटाकण्यात येणार आहे. दरम्यान,गुरूवारी मानाची दिंडी सकाळी ११वाजता व शुक्रवारी रात्री छबिनामिरवणूक निघणार आहे. शनिवारीदहिहंडीचा कार्यक्रम आहे. रांजणाचे वैशिष्ट्य, १२ वर्षेयेथेच श्रीकृष्णाने भरले पाणी
नाथवाड्यात विजयी पांडुरंगाची मूर्तीअसून, येथेच संत एकनाथमहाराजांचे वास्तव्य होते. वाड्यातत्यांनी पंक्ती दिल्या. श्रीकृष्णानेश्रीखंड्या नाव धारण करून १२ वर्षेगोदावरीचे पाणी याच वाड्यातीलरांजणात भरले. हा रांजण चौकोनीअसून, त्याचा तळ गोलाकार आहे.तुकाराम बीजेला श्रीखंड्या म्हणजेचसाक्षात पांडुरंग नाथांच्या घरी आले.त्याच दिवसापासून भगवान पांडुरंगकावडीने गोदावरीचे पाणी आणूनरांजण भरू लागले. या घटनेलासाडेचारशे वर्षांहून अधिक काळलोटला आहे.