नीमच- मंदिरात झाेपलेल्या 3 जैनसाधूंवर जीवघेणा हल्ला, 6 अटकेत:दारूच्या नशेत होते आरोपी, सर्व राजस्थानच्या चित्तौडगडमधील

मध्यप्रदेशातील नीमच जिल्ह्यातील कछाला गावात रविवारी रात्री मंदिरात झोपलेल्या तीन जैन साधूंवर हल्ला झाला. मुनी शैलेष मुनीजी, मुनींद्र मुनीजी आणि बलभद्र मुनिजी यांच्यावर मद्यधुंद अवस्थेतील गुंडांनी हल्ला केला. साधू कसेबसे जीव वाचवून पळाले. मात्र त्यांच्या डोक्यावर आणि पाठीवर गंभीर जखमा झाल्या. एका साधूच्या बोटाला फ्रॅक्चर झाले आहे. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी आणि समाजजनांनी आरोपींचा शोध सुरू केला. दोन आरोपींना जोधा कुंडल गावाजवळ पकडण्यात आले. उर्वरित सहा आरोपींना नीमच पोलिसांनी सोमवारी राजस्थानच्या चित्तौडगड येथून अटक केली. आयजी उमेश जोगा यांच्या मते, सर्व आरोपी चित्तौडगडचे रहिवासी आहेत. ते गावातील एका युवकाला शोधण्यासाठी आले होते, ज्याच्याशी त्यांचा वाद होता. मद्यधुंद अवस्थेत त्यांनी संतांना लक्ष्य केले. दुपारी पाच आरोपींची धिंडही काढण्यात आली. जखमी साधूंची प्रकृती गंभीर, ६ किमी पायी चाललेे, सिंगोलीत गेल्यावर उपचार जोधा कुंडल येथील प्रकाश मेघवंशी यांनी सांगितले की, त्यांनी रात्री ११ वाजता साधूंना मंदिरातून पळताना बघितले. साधूंनी त्यांना सांगितले की, मंदिरात दोन अन्य साधूंनाही काही लोक मारत आहेत. आम्ही गावकऱ्यांच्या मदतीने शैलेष मुनिजी आणि मुनींद्र मुनिजी यांचा शोध घेतला. दोघे गंभीर जखमी होते. ते थरथरत होते. साधू ज्ञानगच्छ समुदायाचे आहेत. त्यांच्या क्रिया अत्यंत कठोर आहेत. ते मोबाईलपासून दूर राहतात, फोटो काढत नाहीत, माईकवर बोलत नाहीत. रात्री कोणालाही स्पर्श करू देत नाहीत. या कठोर नियमांमुळे संतांनी रात्रीच्या घटनेनंतरही लोकांना हात लावू दिला नाही आणि उपचारही घेतले नाहीत. जखमी साधू मुनींद्रजी यांना हातगाडीतून सिंगोली येथे आणण्यात आले, तर उर्वरित दोन साधू जखमी अवस्थेत पायी सुमारे ६ किमी अंतरावर सिंगोली येथे पोहोचले. येथे डॉक्टर होते, पण उपचार सकाळीच करू शकले.