नीलेश चव्हाणच्या अटकेचा थरार:नेपाळचे सिम कार्ड ठरले धागा, पोलिसांनी कसे शोधले लोकेशन? पुणे ते सोनोली प्रवासाचे धागेदोरे

नीलेश चव्हाणच्या अटकेचा थरार:नेपाळचे सिम कार्ड ठरले धागा, पोलिसांनी कसे शोधले लोकेशन? पुणे ते सोनोली प्रवासाचे धागेदोरे

वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणातील आरोप असलेला नीलेश चव्हाण याला नेपाळ सीमेवरून अटक करण्यात आली आहे. मात्र, त्याला अटक करताना पोलिसांना तांत्रिक विभागाचे महत्त्वाचे सहकार्य लाभले आहे. नेपाळमधील मोबाईल सिम कार्ड नीलेश वापरत असल्यामुळे त्याचा माग काढणे अवघड जात होते. मात्र अखेर पोलिसांनी आपला कस पणाला लावला आणि नीलेश चव्हाण याला नेपाळच्या सीमेवरून अटक केली. नीलेश चव्हाण हा 25 मे रोजी दिल्लीहून गोरखपूर दरम्यान खासगी बसने गेला असल्याची माहिती पोलिसांना तपासात मिळाली होती. तसे तांत्रीक तपासा मध्ये त्याचे हे लोकेशन ट्रेस झाले होते. या वेळी बसचे सीसीटीव्ही तपासण्यात आल्यानंतर याची खात्री झाली. मात्र, गोरखपूर मध्ये उतरल्यानंतर नीलेश कुठे गेला? याचा तपास लागत नव्हता. अखेर शेकडो सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर तो नेपाळला गेल्याचे दिसून आले. त्यानंतर 30 मे रोजी पिंपरी चिंचवड पोलिसांनी भारत नेपाळ सीमेवरील उत्तर प्रदेशच्या सोनोली इथे त्याच्या मुसक्या आवळल्या. नीलेश चव्हाण याला अटक करण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांची सहा पथके तैनात करण्यात आली होती. तर पुणे पोलिसांची देखील तीन पथके नीलेश चव्हाण याच्या मागावर होती. त्या दरम्यान त्याचा पुणे, मुंबई, कोकण याबरोबरच कर्नाटक, गोवा अशा परराज्यात देखील त्याचा शोध घेतला जात होता. त्याच्या संपर्कातील अनेक मित्र आणि नातेवाइकांची देखील कसून चौकशी केली जात होती. अशातच तांत्रिक तपासाच्या माध्यमातून नीलेश चव्हाणचे धागेदोरे पोलिसांना मिळाले. अखेर तांत्रिक तपासाच्या माध्यमातूनच पोलिस नीलेश चव्हाण पर्यंत पोहोचण्यात यशस्वी ठरले. नीलेश चव्हाण हा भारतीय मोबाईल सिम कार्ड न वापरता नेपाळमधील सिम कार्ड वापरत असल्यामुळे त्याचा शोध घेणे अवघड जात होते. तसेच तो त्या सिम च्या माध्यमातून नेपाळमधील इंटरनेटचा वापर करत होता. त्यामुळे आता या प्रकरणात नीलेश चव्हाण याला अटक झाल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असा केला संपूर्ण प्रवास नीलेश चव्हाण दहा दिवस फरार होता. यावेळी तो सुरुवातीला पुण्यातून रायगड येथे गेला. रायगड वरुन दिल्ली आणि दिल्लीवरून गोरख-पुरला गेला. गोरखपूर वरुन तो सोनाली म्हणजे उत्तर प्रदेश मध्ये त्याने प्रवास केला. सोनोली येथूनच त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यादरम्यान तो नेपाळमधील काठमांडू आणि भैरवा येथे देखील जाऊन आला असल्याची माहिती पोलिसातील विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment