नीलेश चव्हाणला 3 जूनपर्यंत पोलिस कोठडी:वैष्णवी हगवणे प्रकरणात मोठ्या घडामोडी; शशांकच्या संपर्कात असल्याची माहिती समोर

वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात प्रमुख आरोपींमध्ये समावेश असल्याचा आरोप केला जाणारा नीलेश चव्हाण याला पोलिसांनी नेपाळमधून ताब्यात घेतले आहे. नीलेश चव्हाणला आज पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता, त्याला तीन जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याच्या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या संदर्भातील ही बातमी देखील वाचा… नीलेश चव्हाणच्या अटकेचा थरार:नेपाळचे सिम कार्ड ठरले धागा, पोलिसांनी कसे शोधले लोकेशन? पुणे ते सोनोली प्रवासाचे धागेदोरे आम्ही हे वृत्त अपडेट करत आहोत…