नो निगेटिव्ह मुलाखत:आनंद हे कौशल्य…जगात सर्वात आनंदी व्यक्ती मॅथ्यूंकडून जाणून घ्या गुपिते

जगातील सर्वात आनंदी व्यक्ती कोण? गुगल केल्यास नाव येईल- मॅथ्यू रिकार्ड…वैज्ञानिक संशोधनानुसार मॅथ्यू रिकार्ड सर्वात आनंदी व्यक्ती आहेत. २००० च्या दशकात विस्कॉन्सिन विद्यापीठातील संशोधकांनी त्यांच्या मेंदूचा अभ्यास केला. त्यानुसार त्यांच्या मेंदूत गामा लहरींची पातळी जास्त होती. त्यावरून त्यांच्या आनंदाची पातळी असामान्यपणे खूप जास्त असल्याचे संकेत मिळाले. त्यानंतर त्यांना ‘सर्वात आनंदी व्यक्ती’ हा टॅग प्रदान करण्यात आला. रोज या गोष्टी करा… स्वत:मध्ये या गुणांना विकसित करा : मन आपला चांगला मित्र असतो. तो आपल्याला आनंदी ठेवतो. त्यासाठी काही गुण विकसित केले पाहिजेत. दयाळू, आंतरिक शक्ती, योग्य निर्णय घेण्याची क्षमता हे गुण आपल्याला सुखी करू शकतात. दलाई लामांचा हा सल्ला विशेष मी नेपाळमध्ये होतो. माझ्या वडिलांची प्रकृती ठीक नव्हती. मला घरी परतावे लागले. तेव्हा दलाई लामांनी मला सांगितले, ‘मेडिटेशन ऑन कम्पॅशन’. अर्थात स्वत: बद्दल तसेच इतरांविषयी करुणा ठेवा. त्याचे पालन मी करतो.
दु:खही करुणा शिकवते
दु:खदेखील आपल्याला शिकवते. ते आपल्याला करुणावान बनवते. आंतरिक शक्ती देते. दु:ख करुणेला जन्म देते. करुणा आपल्याला आनंदाकडे घेऊन जाते.