22 सप्टेंबरला राहणार दिवस अन् रात्र समान:दोन्ही गोलार्ध पृथ्वीपासून समसमान अंतरावर

नेहमीच दिवस व रात्र यांचा कालावधी असमान असतो. मात्र रविवारी २२ सप्टेंबरला हा कालावधी प्रत्येकी १२ तासांचा राहील. या दिवशी दोन्ही गोलार्ध पृथ्वीपासून समान अंतरावर राहणार असल्याचे खगोल तज्ज्ञांनी सांगितले. पृथ्वीवर दर वर्षाला २१ मार्च व २२ सप्टेंबर या दिवशी दिवस व रात्र प्रत्येकी १२ तासांचे म्हणजेच समान असतात. या विशेष तारखांना खगोल शास्त्रात विषुवदिन म्हणतात. इतर वेळी दिवस व रात्र नेहमीच लहान-मोठे असतात. दिवस व रात्रीची असमानता ही पृथ्वीच्या आसाच्या कलन्यामुळे निर्माण होते. पृथ्वीच्या परिवलनाचा अक्ष तिच्या परिभ्रमण कक्षेच्या प्रतलाच्या संदर्भात सुमारे २३.६ अंशाने वळलेला आहे. त्यामुळे तिचा उत्तर वा दक्षिण गोलार्ध सूर्याकडे कमी-अधिक झुकलेला राहतो. यामुळे पृथ्वीवरील दिवस-रात्री लहान वा मोठ्या होतात. ऋतु उद्भवतात. तसेच सूर्याचे उत्तरायण व दक्षिणायन घडते. वर्षांतून दोनदा २२ डिसेंबर व २१ जून महिन्यात, अशी स्थिती येते. दिवस-रात्र समान ही अवस्था त्या ठिकाणाच्या स्थानावर, विशेषत: अक्षवृत्तावर अवलंबून असते. जेव्हा कोणताही गोलार्ध सूर्याकडे कललेला नसतो, तेव्हा पृथ्वीवर दिवस व रात्र समान असतात. पृथ्वीच्या परांचल गतीमुळे या दिवसात थोडाफार फरक पडू शकत असल्याचे खगोल अभ्यासकांनी सांगितले. खगोलप्रेमींनीव विद्यार्थ्यांनी २२ सप्टेंबरला दिवस व रात्रीचे प्रत्यक्ष काल मापन करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. प्रकाशवृत्त उत्तर, दक्षिण ध्रुवातून जाणार ^या दोन्ही दिवशी दोन्ही गोलार्ध पृथ्वीपासून समसमान अंतरावर असतात व प्रकाश वृत्त उत्तर, दक्षिण धुवातून जाते. म्हणून पृथ्वीवर दर वर्षाला २१ मार्च व २२ सप्टेंबर या दिवशी दिवस व रात्र प्रत्येकी १२ तासांचे म्हणजेच समान असतात. या विशेष तारखांना खगोल शास्त्रात विषुवदिन म्हणतात.आकाशात वैषुविक व आयनिक वृत्तांचे दोन काल्पनिक छेदनबिंदू आहेत. त्यापैकी एकातून २१ मार्चला सूर्य प्रवेश करतो. – प्रभाकर दोड, खगोल अभ्यासक (विश्वभारतीचे संचालक), अकोला.

​नेहमीच दिवस व रात्र यांचा कालावधी असमान असतो. मात्र रविवारी २२ सप्टेंबरला हा कालावधी प्रत्येकी १२ तासांचा राहील. या दिवशी दोन्ही गोलार्ध पृथ्वीपासून समान अंतरावर राहणार असल्याचे खगोल तज्ज्ञांनी सांगितले. पृथ्वीवर दर वर्षाला २१ मार्च व २२ सप्टेंबर या दिवशी दिवस व रात्र प्रत्येकी १२ तासांचे म्हणजेच समान असतात. या विशेष तारखांना खगोल शास्त्रात विषुवदिन म्हणतात. इतर वेळी दिवस व रात्र नेहमीच लहान-मोठे असतात. दिवस व रात्रीची असमानता ही पृथ्वीच्या आसाच्या कलन्यामुळे निर्माण होते. पृथ्वीच्या परिवलनाचा अक्ष तिच्या परिभ्रमण कक्षेच्या प्रतलाच्या संदर्भात सुमारे २३.६ अंशाने वळलेला आहे. त्यामुळे तिचा उत्तर वा दक्षिण गोलार्ध सूर्याकडे कमी-अधिक झुकलेला राहतो. यामुळे पृथ्वीवरील दिवस-रात्री लहान वा मोठ्या होतात. ऋतु उद्भवतात. तसेच सूर्याचे उत्तरायण व दक्षिणायन घडते. वर्षांतून दोनदा २२ डिसेंबर व २१ जून महिन्यात, अशी स्थिती येते. दिवस-रात्र समान ही अवस्था त्या ठिकाणाच्या स्थानावर, विशेषत: अक्षवृत्तावर अवलंबून असते. जेव्हा कोणताही गोलार्ध सूर्याकडे कललेला नसतो, तेव्हा पृथ्वीवर दिवस व रात्र समान असतात. पृथ्वीच्या परांचल गतीमुळे या दिवसात थोडाफार फरक पडू शकत असल्याचे खगोल अभ्यासकांनी सांगितले. खगोलप्रेमींनीव विद्यार्थ्यांनी २२ सप्टेंबरला दिवस व रात्रीचे प्रत्यक्ष काल मापन करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. प्रकाशवृत्त उत्तर, दक्षिण ध्रुवातून जाणार ^या दोन्ही दिवशी दोन्ही गोलार्ध पृथ्वीपासून समसमान अंतरावर असतात व प्रकाश वृत्त उत्तर, दक्षिण धुवातून जाते. म्हणून पृथ्वीवर दर वर्षाला २१ मार्च व २२ सप्टेंबर या दिवशी दिवस व रात्र प्रत्येकी १२ तासांचे म्हणजेच समान असतात. या विशेष तारखांना खगोल शास्त्रात विषुवदिन म्हणतात.आकाशात वैषुविक व आयनिक वृत्तांचे दोन काल्पनिक छेदनबिंदू आहेत. त्यापैकी एकातून २१ मार्चला सूर्य प्रवेश करतो. – प्रभाकर दोड, खगोल अभ्यासक (विश्वभारतीचे संचालक), अकोला.  

Share