मराठवाड्यात 45 हजार कोटींपैकी 29 हजार कोटींची कामे मार्गी:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावा; मुक्तीसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण

मराठवाड्यात 45 हजार कोटींपैकी 29 हजार कोटींची कामे मार्गी:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावा; मुक्तीसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण पार पडले. मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी सरकार कटीबद्ध असून मराठवाड्यातील जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. मागील वेळी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मराठवाड्यासाठी 45 हजार कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली होती. त्यातील 29 हजार कोटी रुपयांची कामे मार्गी लागत असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केला आहे. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये 45 हजार कोटी रुपयांच्या कामाची घोषणा मराठवाड्यासाठी करण्यात आली होती. यातील 29 हजार कोटी रुपयांची कामे आता मार्गी लागत असून उर्वरित कामे देखील लवकरच मार्गी लागणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी सरकारचे सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचा दावा देखील मुख्यमंत्र्यांनी केला. मराठवाड्याला दुष्काळमुक्त करणे आणि त्यासाठी लागणारा निधी कधीही कमी पडू देणार नाही. सरकार मराठवाड्यातील जनतेच्या पाठीमागे कायम राहील, असे देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे. मराठवाड्याच्या विकासासाठी राज्य सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. नागपूर मुंबई – समृद्ध महामार्गाच्या माध्यमातून मराठवाड्याचा विकासाला चालना मिळणार असल्याचे देखील ते म्हणाले. किर्लोस्कर आणि टेस्टला सारख्या मोठ्या कंपन्या मराठवाड्यामध्ये येत आहेत. त्यामुळे मराठवाड्यातील युवकांना रोजगार देखील मिळणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. मराठवाड्यामध्ये अनेक कंपन्या येत आहेत. या कंपन्यांच्या माध्यमातून मराठवाड्यातील युवकांना रोजगार देण्याचे काम राज्य सरकारच्या माध्यमातून होत आहे. एकूण परदेशी गुंतवणुकीपैकी 52 टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात होत आहे. ही आनंदाची गोष्ट आहे. त्याचा फायदा मराठवाड्याला देखील होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. उद्योगाला चालला देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असल्याचा दावा देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी केला आहे. या संदर्भातील खालील बातमी देखील वाचा… हैदराबाद संस्थान मुक्त करणारे ‘ऑपरेशन पोलो’:निजामी सत्तेला पाच दिवसात पत्करावी लागली शरणागती; कसा राहिला अखेरचा लढा? भारत स्वातंत्र्यानंतर देखील हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा लढा सुरूच होता. मात्र त्यासाठी सरकारला ‘ऑपरेशन पोलो’ राबवावे लागले. काय होते हे ‘ऑपरेशन पोलो’? निजामी सत्तेला पाच दिवसात कशी पत्करावी लागली शरणागती? कसा राहिला अखेरचा लढा? आजच्या मुक्तिसंग्राम दिनाच्या निमित्ताने पाहुयात, या लढ्याच्या शेवटच्या टप्प्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी…. पूर्ण बातमी वाचा…

​मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण पार पडले. मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी सरकार कटीबद्ध असून मराठवाड्यातील जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. मागील वेळी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मराठवाड्यासाठी 45 हजार कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली होती. त्यातील 29 हजार कोटी रुपयांची कामे मार्गी लागत असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केला आहे. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये 45 हजार कोटी रुपयांच्या कामाची घोषणा मराठवाड्यासाठी करण्यात आली होती. यातील 29 हजार कोटी रुपयांची कामे आता मार्गी लागत असून उर्वरित कामे देखील लवकरच मार्गी लागणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी सरकारचे सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचा दावा देखील मुख्यमंत्र्यांनी केला. मराठवाड्याला दुष्काळमुक्त करणे आणि त्यासाठी लागणारा निधी कधीही कमी पडू देणार नाही. सरकार मराठवाड्यातील जनतेच्या पाठीमागे कायम राहील, असे देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे. मराठवाड्याच्या विकासासाठी राज्य सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. नागपूर मुंबई – समृद्ध महामार्गाच्या माध्यमातून मराठवाड्याचा विकासाला चालना मिळणार असल्याचे देखील ते म्हणाले. किर्लोस्कर आणि टेस्टला सारख्या मोठ्या कंपन्या मराठवाड्यामध्ये येत आहेत. त्यामुळे मराठवाड्यातील युवकांना रोजगार देखील मिळणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. मराठवाड्यामध्ये अनेक कंपन्या येत आहेत. या कंपन्यांच्या माध्यमातून मराठवाड्यातील युवकांना रोजगार देण्याचे काम राज्य सरकारच्या माध्यमातून होत आहे. एकूण परदेशी गुंतवणुकीपैकी 52 टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात होत आहे. ही आनंदाची गोष्ट आहे. त्याचा फायदा मराठवाड्याला देखील होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. उद्योगाला चालला देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असल्याचा दावा देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी केला आहे. या संदर्भातील खालील बातमी देखील वाचा… हैदराबाद संस्थान मुक्त करणारे ‘ऑपरेशन पोलो’:निजामी सत्तेला पाच दिवसात पत्करावी लागली शरणागती; कसा राहिला अखेरचा लढा? भारत स्वातंत्र्यानंतर देखील हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा लढा सुरूच होता. मात्र त्यासाठी सरकारला ‘ऑपरेशन पोलो’ राबवावे लागले. काय होते हे ‘ऑपरेशन पोलो’? निजामी सत्तेला पाच दिवसात कशी पत्करावी लागली शरणागती? कसा राहिला अखेरचा लढा? आजच्या मुक्तिसंग्राम दिनाच्या निमित्ताने पाहुयात, या लढ्याच्या शेवटच्या टप्प्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी…. पूर्ण बातमी वाचा…  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment