पद्मश्री जाहीर झाल्यानंतर मारुती चित्तमपल्ली भावुक:गुरुजन, पत्नी आणि निसर्गाला दिले पुरस्काराचे श्रेय; सरकारचेही मानले आभार

पद्मश्री जाहीर झाल्यानंतर मारुती चित्तमपल्ली भावुक:गुरुजन, पत्नी आणि निसर्गाला दिले पुरस्काराचे श्रेय; सरकारचेही मानले आभार

केंद्र सरकारच्या वतीने शनिवारी पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. महाराष्ट्रातील अरण्यऋषी म्हणून ओळखले जाणारे मारुती चित्तमपल्ली यांना यंदा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रतिभावंत लेखक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पक्षीशास्त्रज्ञ व वन्यजीव अभ्यासक अशी मारुती चित्तमपल्ली यांची ओळख आहे. पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतर मारुती चित्तमपल्ली भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी पुरस्काराचे श्रेय त्यांच्या पत्नी, गुरुजन आणि निसर्गाला दिले. मी जवळपास सहा दशके जंगलामध्ये होतो. माझ्या प्रत्येक प्रवासामध्ये माझ्या पत्नीने मला साथ दिली, असे मत मारुती चितमपल्ली यांनी व्यक्त केले. कला, शिक्षण, उद्योग, साहित्य, विज्ञान, क्रीडा, वैद्यकिय, समाजसेवा इत्यादींमध्ये विशेष योगदान देणाऱ्या व्यक्तींना पद्मश्री पुरस्कार दिला जातो. यावर्षी मारुती चितमपल्ली यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर मारुती चित्तमपल्ली यांनी सरकारचे आभार मानले. काय म्हणाले मारुती चितमपल्ली?
मी जवळपास सहा दशके जंगलामध्ये होतो. माझ्या प्रत्येक प्रवासामध्ये माझ्या पत्नीने मला साथ दिली. या पुरस्काराचे श्रेय माझ्या पत्नीचे माझ्या गुरुजनांचे आणि त्या जंगलातील निसर्गाचे असल्याचे चित्तमपल्ली म्हणाले. जवळपास 16 प्रकारची जंगल असतात. ते सर्व जंगल अनुभवण्याचे त्यामध्ये राहण्याचे भाग्य मला लाभले. आज पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर मला प्रचंड आनंद होत आहे. मला सरकारने पद्मश्री पुरस्कार दिल्याने मी सरकारचे आभार व्यक्त करतो. माझ्याकडे जंगलावरची 10 हजार पुस्तके आहेत. मी दररोज ती पुस्तके वाचतो. मराठीसाठी एक लाख नवीन शब्द मी दिले आहेत, ते लिहून शब्दकोश तयार करण्याचे काम सध्या करत असल्याचे चित्तमपल्ली यांनी सांगितले. वन्य जीवन विषद करणारी 25 पुस्तके लिहिली
मारुती चितमपल्ली यांनी वन खात्यात 36 वर्षे सेवा केली. त्या काळात देशभर संशोधकवृत्तीने भटकंती केली. या भटकंतीत 5 लाख किमी प्रवास. 13 भाषांचे ज्ञान. त्याद्वारे आदिवासी व इतर जमातींशी संवाद साधत माहिती मिळवली. त्या माहितीची नोंद केलेल्या व 30 वर्षे जपून ठेवलेल्या शेकडो डायऱ्या आहेत. डायरीतील नोंदीला शास्त्रीय आधार देत पक्षिकोश, प्राणिकोश व मत्स्यकोशाचे लेखन पूर्ण केले. अरण्यवाचनासह प्राणी, पक्षी, वनस्पतीची वैशिष्ट्यांसह वन्य जीवन विषद करणारी 25 पुस्तके लिहिली. निसर्गातील हा ठेवा समाजाला कळावा या भावनेतून सतत कार्यरत हा सकारात्मक विचाराचा ऊर्जाकोश म्हणजे विख्यात लेखक मारुती चितमपल्ली. चितमपल्ली यांची साहित्यसंपदा पक्षी जाय दिगंतरा, जंगलाचं देणं, रानवाटा, शब्दांचं धन , रातवा, मृगपक्षिशास्त्र, घरट्यापलीकडे, पाखरमाया, निसर्गवाचन, सुवर्णगरुड, आपल्या भारतातील साप, आनंददायी बगळे, निळावंती , पक्षिकोश चैत्रपालवी, केशराचा पाऊस, चकवाचांदण : एक वनोपनिषद, चित्रग्रीव, जंगलाची दुनिया, An Introduction to Mrigpakshishastra of Hansdev, नवेगावबांधचे दिवस ही चितमपल्ली यांची महत्त्वाची पुस्तके आहेत. चितमपल्ली यांना मिळालेले पुरस्कार हे ही वाचा… अरण्यऋषी मारुती चितमपल्ली, अशोक सराफ यांना पद्मश्री:मनोहर जोशी यांना मरणोत्तर पद्मविभूष पुरस्कार, देश-विदेशातील 139 जणांचा सन्मान दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान पद्म पुरस्कार जाहीर केला जातो. यंदाच्या पद्म पुरस्कार प्राप्त करणाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातील अनेकांची घोषणा करण्यात आली. डॉ. विलास डांगरे, मारुती चितमपल्ली, चैत्राम पवार आणि अशोक सराफ यांना यंदाचा पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि गायक पंकज उधास यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. पूर्ण बातमी वाचा…

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment