अजमेर दर्ग्यात शिवमंदिर असल्याचा दावा:याचिकेवर 20 डिसेंबरपासून सुनावणी, हिंदू सेनेच्या याचिकेसोबत दिले मंदिर असल्याचे दस्तऐवज, पुरावे
उत्तर प्रदेशातील संभल येथील मशिदीच्या सर्वेक्षणानंतर निर्माण झालेल्या वादानंतर अाता अजमेर येथील ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या दर्ग्याचे प्रकरण न्यायालयात पोहोचले आहे. हिंदू सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णू गुप्ता यांनी अजमेर दिवाणी न्यायालयात (पश्चिम) याचिका दाखल करून दर्ग्यात श्री संकटमोचन महादेव मंदिर असल्याचा दावा केला आहे. निवृत्त न्यायाधीश हरविलास शारदा यांनी १९११ मध्ये लिहिलेले ‘हिस्टॉरिकल अँड डिस्क्रिप्टिव्ह’ हे पुस्तक त्यांनी संदर्भीय दस्तऐवज...