यूपीच्या शेतकऱ्यांचा दिल्लीकडे मोर्चा, नोएडा एक्सप्रेस वे बंद:बॅरिकेडिंग तोडले; पोलिसांनी क्रेन-कंटेनर उभे केले; 5 किमीपर्यंतचा रस्ता जाम
यूपीचे 5 हजार शेतकरी दिल्लीला रवाना झाले आहेत. पोलिसांचे बॅरिकेड तोडले आहेत. शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी दिल्ली-यूपीला जोडणाऱ्या चिल्ला सीमेवर ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावले आहेत. वज्र वाहने आणि आरएएफचे जवान तैनात आहेत. ड्रोनच्या माध्यमातून पाळत ठेवली जात आहे. वाहनांच्या तपासणीमुळे 5 किलोमीटर लांब जाम आहे. नोएडा एक्सप्रेस वे दोन्ही बाजूंनी बंद आहे. तत्पूर्वी, दुपारी 12 वाजता नोएडा येथील महामाया उड्डाणपुलाजवळ शेतकरी जमा...