राजस्थानात 11 वीच्या विद्यार्थिनीचे प्रकरण:विनयभंगप्रकरणी आरोपीने पीडितेशी केलेली तडजोड अमान्य- सुप्रीम काेर्ट
दलित समुदायाच्या एका अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. न्या. सी. टी. रविकुमार आणि न्या. संजय कुमार यांचे खंडपीठ म्हणाले, अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीची पीडितेशी झालेली तडजोड कोर्ट कधीही मान्य करणार नाही. अशा कोणत्याही तडजोडीच्या आधारे फौजदारी खटला फेटाळता येणार नाही. यासह सुप्रीम कोर्टाने राजस्थान हायकोर्टाचा तो निकाल रद्द केला. त्यानुसार ११वीच्या मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपी...