हयातीचा दाखल 30 नोव्हेंबर पर्यंत सादर करणे अनिवार्य ४८ हजार:48 हजार पेन्शनर्सचा प्रश्न, जि. प. कडून अद्याप बँकांना पेन्शनर्सची यादीच उपलब्ध करून दिली नाही

हयातीचा दाखल 30 नोव्हेंबर पर्यंत सादर करणे अनिवार्य ४८ हजार:48 हजार पेन्शनर्सचा प्रश्न, जि. प. कडून अद्याप बँकांना पेन्शनर्सची यादीच उपलब्ध करून दिली नाही

शहर जिल्ह्यातील सर्व कोषागार व जिल्हा परिषद पेन्शनर्स यांनी ३० नोव्हेंबरपर्यंत हयातीचा दाखल सादर करणे अनिवार्य आहे. त्याशिवाय पेन्शन मिळत नाही. त्यामुळे वेळेत हयात दाखला सादर करणे गरजेचे आहे. जिल्हा परिषदेचे ८ हजार व कोषागारचे ४० हजार असे एकूण ४८ हजार पेन्शनर्सचा हा प्रश्न आहे. जिल्हा परिषदेकडून अद्याप बँकांना पेन्शनर्सची यादीच उपलब्ध करून देण्यात आली नाही. त्यामुळे पेन्शनर्स धारकांना बँकेत...

बेताल वक्तव्य करून नवीन प्रश्न निर्माण करू नका- अजित पवार:म्हणाले- राज्य अशी वक्तव्य सहन करत नाही, खोतांच्या वक्तव्याचा निषेध

बेताल वक्तव्य करून नवीन प्रश्न निर्माण करू नका- अजित पवार:म्हणाले- राज्य अशी वक्तव्य सहन करत नाही, खोतांच्या वक्तव्याचा निषेध

निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्यात अनेक नेते येतील, प्रचार सभा हाेतील, मात्र काेणी काेणाबद्दल काही आक्षेपार्ह बाेलू नये. प्रत्येकाची विचारधारा वेगळी असून मतमतांतर असू शकते परंतु ते मांडत असताना काहीतरी त्यास ताळमेळ असावा. विनाशकाले विपरीत बुध्दी असा हा प्रकार आहे. सदा खाेत यांनी पुन्हा असा प्रकार हाेणार नाही असे सांगितले आहे. बेताल वक्तव्य करून नवीन प्रश्न निर्माण करू नका, राज्य अशी वक्तव्य...

संभाजीनगर आगारात 10 नवीन ई-बस दाखल:चिखली, मेहकर, शिर्डी, नाशिकला धावणार, शिवशाहीपेक्षा ई बसचे भाडे जास्त

संभाजीनगर आगारात 10 नवीन ई-बस दाखल:चिखली, मेहकर, शिर्डी, नाशिकला धावणार, शिवशाहीपेक्षा ई बसचे भाडे जास्त

मध्यवर्ती आगाराला आणखी १० ई बस दाखल झाल्या आहेत. एकूण ३८ ई बस झाल्या आहेत. नवीन आलेल्या ५ ई बस चिखली, १ मेहकर आणि चार शिर्डी व नाशिक मार्गावर धावणार आहेत. शिवशाही पेक्षा ई बसचे भाडे जास्त ठेवण्यात आले आहे. त्यामुळे वाहतानुकूलित बस मध्ये आरमदायी प्रवास करण्यासाठी प्रवाशांच्या खिशाला आर्थिक भुर्दंड देखील सोसावा लागणार आहे. ध्वनी व वायू प्रदूषण कमी...

बंडखोरी भोवली:राजेंद्र मुळक यांच्यासह याज्ञवल्क्य जिचकार काँग्रेसमधून 6 वर्षांसाठी निलंबित

बंडखोरी भोवली:राजेंद्र मुळक यांच्यासह याज्ञवल्क्य जिचकार काँग्रेसमधून 6 वर्षांसाठी निलंबित

काँग्रेसने अखेर नागपूर जिल्ह्यातील दोन बंडखोरांवर निलंबनाची कारवाई केली आहे. यात रामटेक मतदारसंघातून बंडखोरी करणारे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक आणि काटोल विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या विरोधात दंड थोपटलेले याज्ञवल्क्य जिचकार यांचा समावेश आहे. मुळक यांनी रामटेकमधून उमेदवारी मागितली होती. मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी ही जागा सोडण्यास नकार दिला. त्यामुळे मुळकांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. ते माघार...

जाहिरातीवरून आघाडी-युतींच्या एकमेकांविरोधात तक्रारी:मविआच्या जाहिरातीत अजित पवारांची, तर भाजपच्या जाहिरातीत कॉंग्रेसची बदनामी

जाहिरातीवरून आघाडी-युतींच्या एकमेकांविरोधात तक्रारी:मविआच्या जाहिरातीत अजित पवारांची, तर भाजपच्या जाहिरातीत कॉंग्रेसची बदनामी

महाविकास आघाडीच्या एका जाहिरातीमधून उपमुख्यमंत्री अजित पवारांना लक्ष्य करत त्यांचे पात्र दाखवण्यात आले आहे. आता, या जाहिरातीविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी मुंबई पोलिस आयुक्तांना पत्र लिहून जाहिरातीमधील मजूकर आणि अजित पवारांच्या पात्राचा उल्लेख करत तक्रार दाखल केली आहे. या जाहिरातीच्या माध्यमातून अजित पवारांची प्रतिमा मलिन करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न महाविकास आघाडीच्यावतीने...

सुवर्ण मंदिरात 34 वर्षीय महिलेची आत्महत्या:7 व्या मजल्यावरून मारली उडी; CCTV फुटेज तपासत आहेत पोलिस

पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिर संकुलात असलेल्या बाबा अटल राय जी गुरुद्वारा साहिबच्या सातव्या मजल्यावरून महिलेने उडी मारली. महिलेच्या डोक्याला मार लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. सध्या शिरोमणी गुरुद्वारा व्यवस्थापन समिती आणि पोलिस या महिलेची माहिती गोळा करत आहेत. वास्तविक, आज सकाळी एक मुलगी सुवर्ण मंदिरात दर्शनासाठी आली होती. तिने मंदिरात डोके टेकवले की नाही हे माहित नाही, परंतु त्यानंतर...

सहारनपूरमध्ये भटक्या कुत्र्यांचा 4 मुलींवर हल्ला:चेहऱ्यावरील मांस खाल्ले; छाती, हात आणि पायांवर गंभीर जखमा

सहारनपूरमध्ये भटक्या कुत्र्यांनी 4 मुलींवर हल्ला केला. मुली मदरशातून परतत होत्या. कुत्र्यांनी त्यांना घेरल्यावर त्या धावू लागल्या. मात्र कुत्र्यांनी त्यांना घेरले आणि हल्ला करण्यास सुरुवात केली. कुत्र्यांनी दोन मुलींच्या चेहऱ्याचे मांस तोडून खाल्ले. तसेच, त्यांच्या छाती, हात व पायाला गंभीर जखमा केल्या आहेत. निरागस मुलींच्या किंकाळ्या ऐकून गावातील लोक धावून गेले. लाठ्या-काठ्या मारून कुत्र्यांना हुसकावून लावले. मुलींना तातडीने जवळच्या सीएचसीमध्ये...

भारती विद्यापीठात बॉम्ब असल्याच्या ईमेलने खळबळ:पोलिस, बीडीडीएस तपासणी नंतर अफवा असल्याचे स्पष्ट

भारती विद्यापीठात बॉम्ब असल्याच्या ईमेलने खळबळ:पोलिस, बीडीडीएस तपासणी नंतर अफवा असल्याचे स्पष्ट

पुणे शहरातील कात्रज परिसरात असलेल्या भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालय व हॉस्टेलमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याचा धमकीचा ईमेल कॉलेज प्रशासनाला प्राप्त झाला. त्यानंतर याबाबतची माहिती त्यांनी तातडीने पोलिसांना दिल्यावर पोलिस बीडीडीएस पथकासह घटनास्थळी दाखल होऊन महाविद्यालय, हॉस्टेल खाली करुन सखोल तपासणी करण्यात आली. परंतु त्यानंतर सदर बाब अफवा असल्याचे स्पष्ट झाले. मात्र, याप्रकरणी संबंधित अनोळखी ईमेल धारका विराधात भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात...

संविधान पवित्र, त्याला रंगात अडकवू नका:मोदींनीही राष्ट्रपतींना लाल रंगाचे संविधान दिले होते; पृथ्वीराज चव्हाणांचा फडणवीसांवर पलटवार

संविधान पवित्र, त्याला रंगात अडकवू नका:मोदींनीही राष्ट्रपतींना लाल रंगाचे संविधान दिले होते; पृथ्वीराज चव्हाणांचा फडणवीसांवर पलटवार

राहुल गांधी संविधनाच्या नावाने लाल पुस्तक का दाखताय? लाल पुस्तकच तुमच्या हातामध्ये का आहे? कुणाला तुम्ही लाल पुस्तकाच्या माध्यमातून इशारा देत आहात, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी उपस्थित केला होता. देवेंद्र फडणवीसांच्या या प्रश्नावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जोरदार पलटवार केला आहे. संविधान हे पवित्र असून त्याला रंगामध्ये अडकवण्याचा केविलवाणा प्रयत्न करू नका, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणालेत. पृथ्वीराज...

राहुल गांधींनी संविधानाचा बारकाईने अभ्यास करावा:माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांचा सल्ला

राहुल गांधींनी संविधानाचा बारकाईने अभ्यास करावा:माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांचा सल्ला

लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस पक्षाचे खासदार राहुल गांधी यांनी केब्रिज येथे भाषण देताना भारत हे राष्ट्र नाही तर एक युनियन स्टेट आहे असे सांगितले. पण भारताच्या संविधानाच्या सरनाम्यातच राष्ट्र असा स्पष्ट उल्लेख आहे. राहुल गांधींना संविधान शिकविले पाहिजे, असे परखड मत माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केले. पूर्व पुण्यातील मंगळवार पेठेत प्रबोधन मंच, श्री सिद्धेश्वर मंदिर ट्रस्ट,...