नवाब मलिकांकडून अजित पवारांवर स्तुतीसुमने:म्हणाले – अजित पवार मर्द माणूस, दिलेला शब्द पाळतात

नवाब मलिकांकडून अजित पवारांवर स्तुतीसुमने:म्हणाले – अजित पवार मर्द माणूस, दिलेला शब्द पाळतात

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक शिवाजीनगर माणखुर्द मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भाजपचा नवाब मलिक यांच्या उमेदवारीला विरोध होता. मात्र, अजित पवारांनी विरोधाला न जुमानता नवाब मलिकांना उमेदवारी दिली आहे. त्यानंतर आता आपण नवाब मलिक यांच्या प्रचाराला देखील जाणार असल्याचे अजित पवारांनी सांगितल्यानंतर नवाब मलिक यांनी त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहे. अजित पवार हा मर्द माणूस आहे, ते दिलेला शब्द पाळतात,...

महिलांच्या हातात देशाचे अर्थकारण असणे प्रगतीचे लक्षण:पैसे बुडून देशातून पळून गेलेले सर्व पुरुष- पंकजा मुंडे

महिलांच्या हातात देशाचे अर्थकारण असणे प्रगतीचे लक्षण:पैसे बुडून देशातून पळून गेलेले सर्व पुरुष- पंकजा मुंडे

महिला कधीच कुणाचे उधार ठेवत नाही, पैसे बुडून देशातून पळून गेलेले सर्व पुरुष आहे. महिलांचे हातात देशाचे अर्थकारण असेल त्यांना प्राेत्साहन दिले गेले तर त्यांच्याकडे आलेले पैसे पुन्हा अर्थव्यवस्थेतच असणार आहे आणि हे प्रगतीचे लक्षण आहे. देश प्रगतीच्या वाटेवर वाटचाल करत असून पंतप्रधान यांची जगात पत वाढलेली आहे. राज्यात पुन्हा महायुती सरकार आले नाही तर नुकसान जनतेचे हाेणार आहे असे...

डुकराला कितीही साबण शांपू लावले तरी गटारीतच जाते:संजय राऊत महाविकास आघाडीचे कुत्रे, सदाभाऊ खोतांची पुन्हा जीभ घसरली

डुकराला कितीही साबण शांपू लावले तरी गटारीतच जाते:संजय राऊत महाविकास आघाडीचे कुत्रे, सदाभाऊ खोतांची पुन्हा जीभ घसरली

महायुतीचे आमदार सदाभाऊ यांनी शरद पवार यांच्यावर वादग्रस्त विधान केले होते. ते प्रकरण तापलेले असतानाच त्यांनी आता खासदार संजय राऊत यांच्यावर देखील खालच्या पातळीवर टीका केली आहे. डुकराला कितीही साबण शांपू लावला तरी डुक्कर गटारीतच जाते, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे. सदभाऊ खोत यांनी शरद पवारांवर केलेल्या वादग्रस्त टीकेनंतर त्यांच्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी टीकेची झोड उठवली आहे. त्यात...

काँग्रेसचाही बंडखोरांवर कारवाईचा बडगा:पक्षातून 6 वर्षांसाठी निलंबन, रमेश चेन्नीथला यांची माहिती

काँग्रेसचाही बंडखोरांवर कारवाईचा बडगा:पक्षातून 6 वर्षांसाठी निलंबन, रमेश चेन्नीथला यांची माहिती

काँग्रेसमधील बंडखोरांवर कारवाई केली असून त्यांचे 6 वर्षांसाठी पक्षातून निलंबन केल्याची माहिती काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी दिली. तसेच राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि प्रियंका गांधी यांच्या महाराष्ट्रातील प्रचार दौऱ्याबाबतही माहिती दिली. काँग्रेस महाराष्ट्रात कुठेही मैत्रीपूर्ण लढत करणार नसल्याचेही त्यांची स्पष्ट केले. आमचे सरकार आल्यावर महालक्ष्मी योजना राबवणार असून त्यात महिलांना महिन्याला 3 हजार रुपये देणार आहोत. कर्नाटक आणि...

मुंडे बहिण-भावाने धमकी देत जमीन बळकावली:पंकजा अन् धनंजय मुंडेंच्या मामी सारंगी महाजन यांचा आरोप

मुंडे बहिण-भावाने धमकी देत जमीन बळकावली:पंकजा अन् धनंजय मुंडेंच्या मामी सारंगी महाजन यांचा आरोप

दिवंगत प्रवीण महाजनांच्या पत्नी सारंगी महाजन यांनी पंकजा मुंडेंसह धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केला आहे. बहिण-भावाने संगनमताने धमक्या देत कोट्यवधी रुपयांची जमीन अल्प किमतीत खरेदी केल्याचे त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषद घेत म्हटले आहे. सारंगी महाजन म्हणाल्या की, पंकजा मुंडे-धनंजय मुंडे यांनी प्रवीण महाजन यांच्या नावे असलेली परळीतील तालुक्यामधील जिरेवाडीच्या गटनंबर 240 मधील 36.50 आर जमिनीचा व्यवहार हा संगनमताने गोविंद...

सरकारी नोकरी:हरियाणात 237 व्याख्याता पदांसाठी भरती; अर्ज आजपासून सुरू, वयोमर्यादा 42 वर्षे

हरियाणा लोकसेवा आयोग (HPSC) ने लेक्चरर पदांसाठी भरती अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार उच्च शिक्षण विभागातील (तंत्रशिक्षण संचालनालय) विविध विषयांच्या अधिव्याख्यात्यांच्या पदांवर नियुक्ती करण्यात येणार आहे. उमेदवार hpsc.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. शैक्षणिक पात्रता: वयोमर्यादा: शुल्क: निवड प्रक्रिया: पगार: रु. 9300 – 34800 (ग्रेड पे रु 4300) याप्रमाणे अर्ज करा: अधिकृत सूचना लिंक ऑनलाइन अर्ज लिंक

हवाई दलाचे पहिले तेजस मार्क 1A ला उशीर:इंजिन अमेरिकन कंपनी बनवतेय; विमान एचएएलचे; मिगची जागा घेणार हे एअरक्राफ्ट

भारतीय हवाई दलाला पहिल्या LCA मार्क-1A लढाऊ जेट (तेजस) विमानासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. या विमानाची निर्मिती हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) करत आहे. या इंजिनचा पुरवठा अमेरिकन कंपनी जनरल इलेक्ट्रिक करणार आहे. जनरल इलेक्ट्रिकने यापूर्वी फेब्रुवारी-मार्चमध्ये डिलिव्हरीचे आश्वासन दिले होते. त्यानंतर ऑक्टोबरपर्यंत पुरवठ्याबाबत बोलले. मात्र यामध्ये अजून विलंब होत आहे. तर HAL विमान आणि एअरफ्रेमवर काम करत आहे. इंजिन...

सरकारी कर्मचाऱ्यांविरुद्ध मनी लाँड्रिंग केससाठी मंजुरी आवश्यक:सर्वोच्च न्यायालयाने म्हटले- ही तरतूद प्रामाणिक आणि निष्ठावान अधिकाऱ्यांना संरक्षण देण्यासाठी आहे

कर्तव्यावर असताना मनी लाँड्रिंगचा आरोप असलेल्या लोकसेवकांविरुद्ध खटला सुरू करण्यापूर्वी सरकारच्या संबंधित प्राधिकरणाची मंजुरी घेणे आवश्यक आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाने बुधवारी सांगितले की CrPC च्या कलम 197 (1) नुसार सरकारी अधिकारी आणि न्यायाधीशांविरुद्ध खटला चालवण्यासाठी सरकारची मंजुरी घ्यावी लागेल अशी तरतूद आहे. ही तरतूद आता प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग ऍक्ट (PMLA) मध्ये देखील लागू झाली आहे. वास्तविक,...

दिल्लीतील 9 भागांत AQI 350 च्या वर गेला:यमुनेत हात टाकल्यास त्वचाविकाराचा धोका, 122 नाल्यांतून सोडले जात आहे पाणी

दिल्लीतील प्रदूषणाची पातळी सातत्याने वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीची हवा सातत्याने गंभीर श्रेणीत नोंदवली जात आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (CPCB) गुरुवारी सकाळी 9 वाजता दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील अनेक मॉनिटरिंग स्टेशन्समध्ये AQI 367 च्या वर नोंदवण्यात आला आहे. यामध्ये आनंद विहार, अशोक विहार, बवाना, जहांगीरपुरी, मुंडका, रोहिणी, सोनिया विहार, विवेक विहार आणि वजीरपूर भागांचा समावेश आहे. या काळात शहरात...

पराली जाळण्याचा दंड दुप्पट:₹5 हजार ते ₹30 हजार भरावे लागतील; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर केंद्राने दंड वाढवला

सुप्रीम कोर्टाच्या कठोर निर्णयानंतर केंद्र सरकारने पराली जाळणाऱ्या शेतकऱ्यांचा दंड दुप्पट केला आहे. पर्यावरण मंत्रालयाने गुरुवारी एक अधिसूचना जारी करून ही माहिती दिली. आता 2 एकरपेक्षा कमी जमिनीवर 5000 रुपये दंड आकारला जाणार आहे. दोन ते पाच एकर जमीन असणाऱ्यांना 10 हजार रुपये आणि पाच एकरांपेक्षा जास्त जमीन असणाऱ्यांना 30 हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा,...